Nashik News : बारागाड्या ओढताना ५ जण जखमी; अक्षय तृतीयेला यात्रोत्सव समारोपावेळी अपघात

Nashik News : अक्षय तृतीयेनिमित्ताने परंपरेनुसार अनेक गावांमध्ये यात्रोत्सव किंवा बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला असतो.
Nashik News
Nashik NewsSaam tv

अजय सोनवणे 

नाशिक : नाशिकच्या देवळा तालुक्यातील मेशी गावातील ग्रामदैवत जगदंबा मातेच्या सात दिवस यात्रोत्सव भरत असतो. (Nashik) या यात्रोत्सवाचा समारोप अक्षय तृतीयेच्या दिवशी बारागाड्या ओढून होत असतो. परंपरेनुसार आज या बारागाड्या ओढत असताना त्या मार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या गर्दीत घुसून झालेल्या (Accident) अपघातात ५ भाविक जखमी झाले आहे. 

Nashik News
Lightning Strike : वीज पडून महिलेचा मृत्यू, दोनजण जखमी; धडगाव तालुक्यातील घटना

अक्षय तृतीयेनिमित्ताने परंपरेनुसार अनेक गावांमध्ये यात्रोत्सव किंवा बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला असतो. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील मेशी गावात जगदंबा मातेचा सात दिवसांचा यात्रोत्सव भरविण्यात आलेला होता. या यात्रोत्सवाचा आज शेवटचा दिवस होता.  

Nashik News
Lok Sabha Election : मतदानासाठी १२५५ वाहनांची व्यवस्था; ३५२ बससाठी मोजले ८८ लाख रुपये

बारागाड्या ओढताना घुसल्या गर्दीत 

दम्यान आज अक्षय तृतीयेच्या दिवशी अंतिम दिवस म्हणून देवीच्या रथाची सवाद्य मिरवणूक व बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो. बारा गाड्या ओढतांना भाविकांची गर्दी जास्त झाल्याने बारागाड्या नियोजित मार्गावरून एकाच बाजूला ओढल्या गेल्या. या घटनेत ५ भाविक जखमी झाले. घटनेतील जखमींना ग्रामस्थानी तातडीने वैद्यकीय उपचारासाठी देवळा व मालेगाव येथे दाखल करण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com