Lightning Strike : वीज अंगावर कोसळून तरुणाचा मृत्यू; सासरी गेला असताना घडली घटना

Chopda News : दुपारी चारच्या सुमारास तो शेतात गेला असताना आकाशात ढग जमा होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाळा सुरवात झाली
Lightning Strike
Lightning StrikeSaam tv

चोपडा (जळगाव) : मध्यप्रदेशातील धावड येथे सासुरवाडीला गेलेल्या तरुणाच्या अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत तरुण हा (Chopda) चोपडा तालुक्यातील मालापूर येथील रहिवासी आहे. हि घटना ९ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. 

Lightning Strike
Lok Sabha Election : मतदानासाठी १२५५ वाहनांची व्यवस्था; ३५२ बससाठी मोजले ८८ लाख रुपये

रेवसिंग दिलीप पावरा (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे. रेवसिंग हा (Madhya Pradesh) मध्य प्रदेशातील धावड (ता. वरला, जि. बडवाणी) येथे सासरवाडीला गेला होता. दरम्यान दुपारी चारच्या सुमारास तो शेतात गेला असताना आकाशात ढग जमा होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाला (Lightning Strike) सुरवात झाली. याच वेळी रेवसिंग याच्या अंगावर वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू (Death) झाला.

Lightning Strike
Nashik News : बारागाड्या ओढताना ५ जण जखमी; अक्षय तृतीयेला यात्रोत्सव समारोपावेळी अपघात

रेवसिंग याच्या पश्चात पत्नी, तीन मुले, आई, वडील असा परिवार आहे. मृत्यूची बातमी समजताच परिवाराने एकच आक्रोश केला. मृत रेवसिंग पावरा जळगाव (Jalgaon) येथील विधी महाविद्यालयात एलएलबीच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होता. घरातील करता व्यक्तीचा मृत्यू झाल्याने परिवाराचा आधार गेला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com