Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : तर मतदानावर बहिष्कार; पैसे मिळत नसल्याने ठेवीदार संतप्त

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : नाशिकच्या येवला तालुक्यासह मनमाडमधील जनता नागरी पतसंस्थेचे अनेक खातेदार असून येथील (Nashik) नागरिकांच्या मोठ्या ठेवी या पतसंस्थेत आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून संस्थापक व संचालक यांनी मोठा घोटाळा (Scam) केल्याने ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळत नाही. यामुळे संतप्त झालेल्या ठेवीदारांनी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला आहे. (Breaking Marathi News)

नाशिकच्या येवला शहरातील हुतात्मा स्मारक याठिकाणी जनता नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी एकत्र येऊन संस्था चालक दौलतराव ठाकरे व संचालक मंडळ तसेच घोटाळ्यामध्ये सहभागी असलेले कर्मचारी यांना तातडीने अटक करून ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्या यासाठी निदर्शने केली. ठेवीदारांनी अनेक वेळा पैसे मिळावे यासाठी प्रयत्न केले. परंतु ठेवी मिळत नसल्याने  आज (Manmad) मनमाड, येवला येथील सर्व ठेवीदारांनी निदर्शने केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जनता नागरी पतसंस्थेमध्ये अनेक हातावर काम करणाऱ्या, कष्टकरी, तसेच सेवानिवृत्त नागरिकांचे पैसे अडकले आहेत. सहकार खाते तर हात धरून बसले आहे. यातील मुख्य सूत्रधार दौलतराव ठाकरे अनेक दिवसांपासून फरार असून पोलिसांना अद्याप मिळून आलेला नाही. वारंवार आंदोलन उपोषण करून सुद्धा शासन दखल घेत नाही. म्हणून लवकर न्याय न मिळाल्यास आगामी लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय याप्रसंगी घेण्यात आला असून भविष्यात आणखी तीव्र स्वरूपाच्या आंदोलन देखील करण्यात येणार असल्याची माहिती ठेवीदारांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार 3000 रुपये? CM शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य; वाचा...

IND-W vs PAK-W: You Miss I Hit..! पहिलीच ओव्हर अन् रेणुकाच्या In Swinger वर फेरोजाची दांडी गुल

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT