Nashik City Bus Service : सिटी लिंक बस सेवा 7 व्या दिवशी ठप्प, प्रवाशांचे हाल सुरुच; नाशिक महापालिकेने ठेकेदाराला बजावली नाेटीस

nashik city link bus : सिटी लिंक बस सेवा सुरळीत हाेईल अशी चिन्हं संपाच्या तिस-या दिवशीच हाेती. परंतु कर्मचा-यांना पगार न मिळाल्याने त्यांनी संप सुरुच ठेवला.
employees strike interrupts nashik city link bus service since 7 days
employees strike interrupts nashik city link bus service since 7 days Saam Tv

Nashik :

नाशिक शहरातील महापालिकेची सिटी लिंक बस सेवा (Nashik City Bus Service) आज (बुधवार) सलग सातव्या दिवशी विस्कळीत झाली आहे. पगार आणि पीएफ मिळाल्यावरच कामावर रुजू हाेणार असा पवित्रा कर्मचा-यांनी घेतला आहे. यामुळे आजही बस सेवा ठप्प झाल्याचे चित्र आहे. (Maharashtra News)

नाशिक सिटी लिंक बस सेवेच्या कर्मचाऱ्यांना नाशिक महापालिका प्रशासनाने आश्वासन देऊनही अद्याप कर्मचा-यांचे गेल्या दोन महिन्यांचा पगार झाला नाही. यामुळे कर्मचा-यांनी संपाची भूमिका घेत सलग 7 व्या दिवशी बस वाहतुक बंद ठेवली आहे. यामुळे बसच्या फेऱ्यांवर माेठा परिणाम झाला आहे.

employees strike interrupts nashik city link bus service since 7 days
Nashik Crime News : गुजरात परिवहन बसमधून महाराष्ट्रात आणले जात हाेते लाखाचे मद्य, दिंडाेरीत पाेलिसांचा छापा; दाेघांवर गुन्हा

दरम्यान महापालिका प्रशासनाने ठेकेदाराला ठेका रद्द करण्याची अंतिम नोटीस बजावल्याची समजते. तातडीने बस सेवा सुरू न झाल्यास ठेका रद्द करून नवीन ठेकेदार नेमणार असे नाेटीसमध्ये नमूद केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ठेकेदार आणि कर्मचारी यांच्या वादात प्रवासी वेठीस धरले जात असल्याने प्रशासनाकडून ठेकेदाराला कडक निर्देश देण्यात आले आहेत. दूसरीकडे नाशिकरोड डेपोची सिटी लिंक बस सेवा मात्र सुरळीत आहे.

Edited By : Siddharth Latkar

employees strike interrupts nashik city link bus service since 7 days
Sambhajinagar News : शेंद्रा, जालना एमआयडीसीसह ऑरिक सिटीचा दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com