Nashik Crime News : गुजरात परिवहन बसमधून महाराष्ट्रात आणले जात हाेते लाखाचे मद्य, दिंडाेरीत पाेलिसांचा छापा; दाेघांवर गुन्हा

या मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेला गुजरातच्या दिव-दमण येथून गुजरात राज्य परिवहन बस मधून अवैधरित्या दारू येत असल्याची माहिती मिळाली.
nashik local crime branch seized liquor of 1 lakh gujarat state transport bus
nashik local crime branch seized liquor of 1 lakh gujarat state transport busSaam Digital

- अजय सोनवणे

Nashik :

नाशिक स्थानिक गुन्हे शाखेने (nashi local crime branch) दिंडोरी (dindori) नजीक बसमधून अवैधरित्या नेली जाणारी एक लाख १४ हजार रुपये किमतींचा मद्यसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी पाेलिसांनी दाेघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News)

लोकसभा निवडणुकीच्या (lok sabha election 2024) पार्श्वभूमिवर अवैध व्यवसायाचे उच्चाटन करण्यासाठी नाशिक जिल्हा पोलिस प्रमुखांनी पाऊल उचलले आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गावरुन अवैध्यरित्या होणारी मद्य वाहतूक व विक्री रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात चेकपोस्टवर नाका बंदीचे आदेश दिले. त्याची कार्यवाही नुकतीच सुरु झाली.

nashik local crime branch seized liquor of 1 lakh gujarat state transport bus
ICAI CA May 2024 Exams Postponed: लोकसभा निवडणुकांमुळे सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या वेळापत्रकात माेठा बदल, मंगळवारी हाेणार जाहीर

या मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेला गुजरातच्या दिव-दमण येथून गुजरात राज्य परिवहन बस मधून अवैधरित्या दारू येत असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने दिंडोरी जवळ सापळा रचला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाेलिसांनी बसची तपासणी केली. त्यात दारु बाटल्या आढळल्या. संबंधितांकडे चाैकशी केली असता त्यांची भांबेरी उडाली. पाेलिसांनी सुमारे 1 लाख 14 हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. पाेलिसांनी गुजरात परिवहन विभागाचे चालक व वाहक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

nashik local crime branch seized liquor of 1 lakh gujarat state transport bus
Success Story : द्राक्षच्या पंढरीत तैवान पेरुची लागवड, अल्पावधीत शेतक-याने कमावले 8 लाख

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com