Dhananjay Munde Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: आनंदवार्ता! नाशिकमधील 6 लाख शेतकऱ्यांना ८५३ कोटी मिळणार, ३१ ऑगस्टआधी खात्यावर जमा होणार पैसे

Dhananjay Munde Big Announcement: नाशिक जिल्ह्यातील ५ लाख ८८ हजार शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये २१ दिवसांच्या पाऊस खंडामुळे शेतकऱ्यांना ७९ कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता.

Priya More

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नाशिक जिल्ह्यातील जवळपास ६ लाख शेतकऱ्यांना पिक विम्यापोटी देय असलेले ८५३ कोटी रुपये ३१ ऑगस्ट पूर्वी मिळणार असल्याची घोषणा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिकमध्ये केली. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जनसन्मान यात्रा दौऱ्यानिम्मित नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली.

मागील वर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या जवळपास ५ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना ८५३ कोटी रुपये विमा रक्कम येत्या ३१ ऑगस्ट पूर्वी त्यांच्या खात्यात जमा होतील, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. पिक विमा आणि जिल्ह्यातील कृषी संबंधित विषयांच्या संदर्भात पुढील आठवड्यात मुंबई येथे पिकविमा कंपनीचे अधिकारी , छगन भुजबळ , पालकमंत्री दादाजी भुसे, नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठकही घेणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

जन सन्मान यात्रेनिम्मिेत नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली असता त्यांनी प्रलंबित विम्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगा आधारे आणि उत्पन्नात आलेली घट या आधारित देय असलेले ८५३ कोटी रुपये इन्शुरन्स कंपनीकडून येणे प्रलंबित असल्याची माहिती मिळताच धनंजय मुंडे यांनी कंपनीचे राज्यप्रमुखांशी संपर्क केला आणि त्यांच्याकडून शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम तातडीने देण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील ५ लाख ८८ हजार शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये २१ दिवसांच्या पाऊस खंडामुळे शेतकऱ्यांना ७९ कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता. त्याचबरोबर स्थानिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान या पोटी २५ कोटी ८९ लाख मंजूर झाले होते आणि त्याच्या वाटपाची कारवाई सुरू आहे. त्यानंतर कृषी मंत्री मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना ८५३ कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

SCROLL FOR NEXT