Maharashtra Government: राज्य सरकारचं पोलीस पाटलांना गिफ्ट; मानधनात भरघोस वाढ

Police Patil Payment: गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनाची मागणी रखडली होती, आज शेवटी ही मागणी पूर्ण झाली असून त्यांना १५००० रुपये वेतन मिळणार आहे. २०१९ पूर्वी पोलीस पाटलांचे मानधन केवळ ३ हजार रुपये होते.
Maharashtra Government
Maharashtra GovernmentSakal
Published On

Police Patil Payment Increased State Government Cabinet Decision :

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या राज्यांमधील कोतवाल आणि पोलीस पाटील यांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आलीय. गावातील पोलीस पाटील यांना मासिक वेतन १५ हजार रुपये दिले जाणार आहे. मानधन वाढीसाठी माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी भक्कम पाठपुरावा केला होता. (Latest News)

दरम्यान मागील वर्षाच्या मार्च महिन्यात देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस पाटील यांच्या पगारसंदर्भात घोषणा केली होती. सरकार पोलीस पाटील यांच्या मागण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचं फडणवीस म्हणाले होते. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनाची मागणी रखडली होती, आज शेवटी ही मागणी पूर्ण झाली असून त्यांना १५००० रुपये वेतन मिळणार आहे. २०१९ पूर्वी पोलीस पाटलांचे मानधन केवळ ३ हजार रुपये होते. त्यानंतर फडणवीस सरकारने पोलीस पाटलांचे मानधन ३ हजार रुपयांवरून ६ हजार ५०० रुपये केले होते. आता पुन्हा एकदा पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ झालीय.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच संरक्षण

गाव पातळीवर पोलिसांचा प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या पोलीस पाटलांना आता इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच कलम ३५३चे संरक्षण देण्याचा निर्णय सरकारने आधीच घेतलाय. या निर्णयाने कर्तव्य बजावत असताना पोलीस पाटलांना मारहाण झाल्यास आता सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा संबंधित आरोपींविरूदध दाखल केला जातो.

मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढवलं

राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालयांमधील मानसेवा (निकत) अध्यापकांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय आज घेण्यात आलाय. एका मराठी वृत्तावाहिनीनुसार, या नव्या निर्णयानुसार प्राध्यापकांना ३०,००० रुपये तर सहयोगी प्राध्यापकांना २५,००० रुपये मानधन मिळणार आहे.

राज्यातील आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या (State Government) नि‍धीतून दिल्या जाणाऱ्या मानधानात वाढ करण्यात आल्याचा निर्णय घेतला. आशा स्वयंसेविकांच्या मानधनात ५ हजार रुपयांची वाढ करण्यात आलीय. मानधनातील ही वाढ नोव्हेंबर २०२३ या महिन्यापासून देण्यात येईल. 

Maharashtra Government
Maharashtra Government : आशा स्वयंसेविकांचं मानधन वाढलं, कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com