Maharashtra Government : आशा स्वयंसेविकांचं मानधन वाढलं, कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरी

Maharashtra Cabinet Meeting : राज्यातील आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या नि‍धीतून दिल्या जाणाऱ्या ५ हजार रुपयांची वाढ करण्यास मान्यता देण्यात आल्याचा निर्णय सरकारने घेतलाय. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेतलं जाणार आहे.
Maharashtra Government : आशा स्वयंसेविकांचं मानधन वाढलं, कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरी
Published On

Maharashtra Cabinet Meeting Decisions For ASHA volunteers:

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात सर्वात महत्त्वाचे २ निर्णय म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरी देणे. तसेच आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय. या २ निर्णयामुळे सामन्यवर्गात आनंदाचे वातावरण आहे.(Latest News)

राज्यातील आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या (State Government) नि‍धीतून दिल्या जाणाऱ्या ५ हजार रुपयांची वाढ करण्यास मान्यता देण्यात आल्याचा निर्णय सरकारने घेतलाय. मानधनातील ही वाढ नोव्हेंबर २०२३ या महिन्यापासून देण्यात येईल. २०२३ -२४ या आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली २००.२१ कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आलीय. तसेच ९६१.०८ कोटीच्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आलीय.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळाली सरकारी नोकरी

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारे आज घेतलाय. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी १० वर्ष आणि त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेतील मंजूर समकक्ष पदांवर सामावून घेण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलीय.

राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.या निर्णयानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी १० वर्ष आणि त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी वयाची अट शिथिल करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य विभागातील नियमित पदांकरिताचे सेवाप्रवेश नियमांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करुन कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आरोग्य सेवेतील मंजूर समकक्ष पदांवर रिक्त पदांच्या ३० टक्के प्रमाणात समायोजन केले जाणार आहे. तर ७० टक्के पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत.

या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवा समावेश केल्यानंतर त्यांचे वेतन त्यांना लगतच्या मागील महिन्यामध्ये प्राप्त होणाऱ्या मानधना एवढ्या नियमित वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्यास मान्यता देण्यात आलीय. केंद्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक आर्हतेबाबत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या सुचना, मार्गदर्शन तत्वे यांचे काटेकोरपणे पालन करुन समायोजन करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली.

श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार

बडगाम जिल्ह्यातील इच्चगाम तालुक्यात महाराष्ट्र (Maharashtra State) राज्य अतिथीगृह बांधण्यात येणार आहे, त्यासाठी अडीच एकर भूखंड घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीर येथे देशातील जनतेने पर्यटनाचा लाभ घ्यावा यादृष्टीने जम्मू- काश्मीर येथे जाणाऱ्या पर्यटकांची सोयीस्कर, आरामदायी व माफक दरामध्ये निवासाची व्यवस्था होण्यासाठी जम्मु आणि काश्मीरमध्ये रु.८.१६ कोटी रकमेचा क्र.५७६ मधील २० कनाल क्षेत्रफळ (२.५० एकर) भूखंड महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधकामासाठी मंजूर करण्यात आला आहे.

Maharashtra Government : आशा स्वयंसेविकांचं मानधन वाढलं, कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरी
Ahmednagar Renamed As Ahilyanagar: अहमदनगर नव्हे, आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

ITIमधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना शासनसेवेत सामावून घेणार

राज्यात सध्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये कार्यरत २९७ कंत्राटी शिल्पनिदेशकांचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागात सामावून घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये मनुष्यबळाची कमतरता भरुन निघण्यास मदत होणार आहे. शासकीय सेवेत सामावण्यात येणाऱ्या २९७ पदांकरीता वेतन व इतर भत्यांकरता १६.०९ कोटी प्रति वर्ष इतक्या खर्चास सुद्धा यावेळी मान्यता देण्यात आली.

राज्यातील महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दुसरी व तिसरी पाळी आणि उर्वरित औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दुसरी पाळी ऑगस्ट, २०१० सत्रापासून यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. येथील सर्व विद्यार्थांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com