Malegaon News Saam tv
महाराष्ट्र

Malegaon News : बनावट दारू कारखाना उध्वस्त; ४ जण ताब्यात, मालेगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Nashik News : आगामी येत असलेल्या ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या मद्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असते. थर्टीफर्स्टचे नियोजन करणारे आतापासूनच बुकिंग करून ठेवत असतात.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 
मनमाड (नाशिक)
: नवीन वर्ष सुरु होण्यास आठवडाभराचाच कालावधी आहे. अर्थात थर्टीफर्स्ट साजरी करताना पार्टी करण्यात येत असते. यात मोठ्या प्रमाणात मद्याचा वापर होत असतो. या पार्श्वभूमीवर छुप्या पद्धतीने वाहतूक केली जात आहे. दरम्यान मालेगाव रस्त्यावर बनावट दारू निर्मितीच्या कारखान्यावर छापा टाकून कारखाना उध्वस्त करण्यात आला आहे. 

आगामी येत असलेल्या ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या मद्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असते. थर्टीफर्स्टचे नियोजन करणारे आतापासूनच बुकिंग करून ठेवत असतात. त्यानुसार कारखान्यांमध्ये बनावट दारू तयार केली जात असल्याचा संशय राज्य उत्पादन विभागाचे नाशिक विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी सांगितले. यानुसार माहिती मी मिळाल्यानंतर सदरची कारवाई करण्यात आली आहे. 

नाशिकच्या मालेगाव राज्य उत्पादन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मनमाड- मालेगाव रस्त्यावरील घोडेगाव शिवारात हि कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला घोडेगाव शिवारात दारू निर्मितीचा कारखाना सुरु असून याठिकाणी देशी व इंग्लिश दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली होती.

७० लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

कारखाना सुरू असल्याची माहिती मिळताच मालेगावच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने याठिकाणी छापा मारत तयार झालेली दार, मशनरी, लेबल तसेच खाली बाटल्या असा ७० लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे. थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर हि कारवाई मोठी मानली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Electric Highway : मुंबई-पुण्याचा प्रवास आता आणखी स्वस्तात, इलेक्ट्रिक हायवेमुळे होणार फायदाच फायदा, वाचा सविस्तर

SIM Card Rules: सतर्क राहा! जास्त सिमकार्ड ठेवाल तर सरकारची कारवाई, नियम मोडल्यास २ लाख रुपयांचा दंड

Maharashtra Live News Update : मालाडमध्ये अग्नितांडव, १५ ते २० गाळ्यांना लागली आग

Shirdi Sai Sansthan: साई संस्थेच्या 47 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; शिर्डीत खळबळ, कारण काय? VIDEO

Cancer Signs: ७ लक्षणं दिसल्यास ९० दिवसांत डॉक्टरांकडे जा, कॅन्सर मूळापासून नष्ट होणार, वाचा तज्ज्ञांनी काय सांगितलं

SCROLL FOR NEXT