Loss Vision In Ganpati Rally Saam TV
महाराष्ट्र

DJ Laser Light: विसर्जन मिरवणुकीनंतर डोळ्यांवर घातक परिणाम; डीजेच्या लेझर लाईटने दृष्टी झाली कमी

Loss Vision In Ganpati Rally: नेत्ररोग तज्ञ संघटनेने सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती देखिल सुरू केली असून, सरकारने या विषयात गांभीर्याने लक्ष घालण्याची विनंतीही केली आहे.

Ruchika Jadhav

Nashik News:

नाशिक गणपती विसर्जन मिरवणुकीतील डीजे सिस्टीमसोबत असलेल्या लेझर शोमुळे जिल्ह्यात 6 जणांच्या दृष्टीवर भयानक परिणाम झाला आहे. नेत्ररोग तज्ञ संघटनेने सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती देखिल सुरू केली असून, सरकारने या विषयात गांभीर्याने लक्ष घालण्याची विनंतीही केली आहे. (Latest Marathi News)

गणपती मिरवणूक ही पारंपारीक पद्धतीने काढली जावी असं राज ठाकरेंनीं म्हटलं होतं. डीजे पेक्षा ढोल, ताशा या वाद्यांच्या आवाजात आनंद साजरा करावा. डीजेच्या आवाजाने नागरिकांना त्रास होतो. अनेकांना विविध आजार उद्भवतात, असं राज ठाकरे म्हणाले होते.

राज ठाकरेंच्या ट्विटनंतर हा विषय चर्चेत आला असतानाच नाशिकमध्ये तशी प्रकरणे समोर येऊ लागलीयेत. या डीझेवरील लेजर लाइट्सचा माणसांच्या डोळ्यावर जास्त घातक परिणाम होत आहे, असं पुढे आलेल्या रुग्णांच्या तपासणीत समोर आलं आहे.

नाशिकमध्ये डोळ्यांची तक्रार घेऊन येणाऱ्या व्यक्तींची संख्या अचानक वाढली. एकसारखी तक्रार घेऊन व्यक्ती आले होते. त्यांना अचानक दिसायला कमी झाले आणि डोळेही दुखू लागले. वैद्याकीय तपासात डीजेच्या लाईट्समुळे असं झाल्याचं समजलं. यातील काही रुग्णांच्या डोळ्यांवर इतका परिणाम झाला आहे की, त्यांना पून्हा आधीसारखी दृष्टी मिळणे कठीण आहे. नाशिकसह अन्य शहरांमध्येही असे रुग्ण आढळत असल्याचं डॉक्टर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातल्या ४ मतदारसंघात भाजप आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT