तबरेज शेख
नाशिक शहरात काल दिवसभर गणपती विसर्जनाची धामधूम पाहायला मिळाली. विसर्जनावेळी लाखोंच्या संख्येने भाविक रस्त्यावर उतरले होते. संपूर्ण शहरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले होते. अशात नाशिक शहरात काल विसर्जनावेळी बऱ्याच दुर्घना घडल्या. यामध्ये एकूण ८ जणांना आपला जीव गमवावा लागला. (Latest Marathi News)
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नाशिकच्या गणेश विसर्जनाच्या उत्सवात ८ जणांचा विविध घटनेत मृत्यू झाला आहे. यात ७ जणांचा पाण्यात बुडून तर ४ वर्षीय चिमुरड्याचा ट्रॅक्टर खाली सापडून मृत्यू झाला आहे. नाशिकच्या गोदावरीमध्ये ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस तपासात आतापर्यंत तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर एकाचा अद्याप शोध सुरू आहे.
महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी तसेच जीवरक्षक यांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे. वालदेवी धरणार २ महाविद्यालयीन तरुणास एक विवाहित तरुणाचाही काल मृत्यू झालाय. पाण्याचा अंदाज न आल्याने युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे.
काल मुंबईपासून संपूर्ण राज्यात जल्लोषाचे वातावरण होते. अशात मुंबईच्या जुहू चौपाटीवर काल मुसळधार पाऊस सुरु होता. यामध्ये वीज पडल्याची दुर्घटना घडली. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यासह रायगडच्या गणेश विसर्जनात विघ्न पाहायला मिळालं. गणपती विसर्जनासाठी गेलेले चार गणेशभक्त उल्हास नदीत वाहून गेल्याची घटना घडली. यात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.