BJP leaders and party workers gather at the Nashik party office amid intense lobbying for nominated corporator posts Saam Tv
महाराष्ट्र

जागा ५ अन् अर्ज ५००; भाजपचीच अग्निपरीक्षा, कोण होणार स्वीकृत नगरसेवक?

BJP Nominated Corporator Selection Process In Nashik: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडे तब्बल ५०० इच्छुकांचे अर्ज दाखल. केवळ ५ जागांसाठी सुरू झालेली लॉबिंग आणि पक्षाची अग्निपरीक्षा. नेमकी कोणाला मिळणार संधी?

Omkar Sonawane

नाशिक: महापालिका निवडणुकीमध्ये भाजपमध्ये जो राडा झाला तो अवघ्या महाराष्ट्राने बघितला. शिस्तबद्ध अशी ओळख असणाऱ्या पक्षाने थेट एबी फॉर्मच गाडीमध्ये पळवून लावले आणि त्याच्यामागे इच्छुकांनी केलेला सिनेस्टाइल पाठलाग. निष्ठवंतांना डावलून उपऱ्यांच्या घरात 3-3 तिकिटे दिल्याने नाशिकच्या भाजप कार्यालयाबहेर जोरदार राडा ही झाला. इतके होऊनही भाजपने शहरात जोरदार मुसंडी मारत पुन्हा एकदा नाशिक महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला.

आता महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीनंतर आता भाजपसह सर्वच पक्षांना स्वीकृत सदस्यपदाचे वेध लागले आहे. भाजपकडे तब्बल 500 जणांनी दावेदारी केली आहे. त्यासाठी पक्ष कार्यालयातील नावांनी रजिस्टरच भरले आहे. यामध्ये फक्त संघटनेतील पदाधिकारीच नाहीये तर महापालिकेमध्ये पराभूत झालेले देखील दावेदार आहेत.

मंगळवारी (दि.3) मंत्री गिरीश महाजन नाशिकच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या येण्याआधीच अनेकांनी लॉबीग सुरू केली होती. महापालिकेत एकूण 10 स्वीकृत सदस्य दावेदार असून त्यामध्ये भाजपच्या वाटेला 6 जण असणार आहेत. विविध क्षेत्रात तज्ञ जाणकार व्यावसायिक महापालिकेत या निमित्ताने दाखल होऊन त्यांनी महापालिकेला मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा आहे. मात्र पक्षाचे लेबल लावलेलेच कार्यकर्ते पुन्हा या पदावर बसवले जातात.

महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे सुमारे 1 हजार अर्ज आले होते. त्यामध्ये 118 जणांना उमेदवारी देण्यात आली. ज्यांना डच्चु मिळाला त्यांनी इतर पक्षांत जाऊन उमेदवारी मिळवली असली तरी काहींनी मात्र निवडणुकीत बंडखोरी किंवा विरोधात काम करू नये यासाठी स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छूकांना स्वीकृत नगरसेवकपदासाठी संधी देऊ असे आश्वासन पक्ष नेत्यांनी दिले होते. त्यामुळे आता सर्वांनीच तशी तयारी केली आहे. भाजपच्या शहराध्यक्ष सुनील केदार यांच्यासह 500 इच्छुकांनी पक्ष कार्यालयातील रजिस्टरमध्ये नोंद केली आहे. त्यामुळे पक्ष नेते कोणाला संधी देते याकडे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: कोल्हापूर हळहळलं! पोटच्या मुलासाठी २० वर्षे सोसल्या झळा, पण क्षणात सर्व संपलं; दुधाच्या पातेल्यात पडून चिमुरडीचा मृत्यू

Maharashtra Live News Update: पुण्यासह राज्यात उन्हाचा तडाखा, सलग दोन दिवस कमाल तापमानाने पस्तीशी ओलांडली

Kalashtami 2026: यंदाच्या कालाष्टमीला 'शिव योगा'सोबत बनणार दुर्मिळ योग; पाहा कधी आहे शुभ मुहूर्त

न भूतो न भविष्यती! बायकोने दिली नवऱ्याला पोटगी अन् झाला घटस्फोट; पुण्यातील त्या कपलची गोष्ट ऐकून थक्क व्हाल

Black Saree Designs: काळ्या रंगाच्या साडीचे लेटेस्ट 5 पॅटर्न, प्रत्येक महिलेला शोभून दिसतील

SCROLL FOR NEXT