Nashik News Saam Tv
महाराष्ट्र

स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवणाऱ्या नाशिकचे सर्व रस्ते खड्ड्यात; मात्र महापालिका प्रशासनाचा अजब दावा...

कोट्यावधींचे रस्ते एकाच पावसात खड्ड्यात जात असल्यानं रस्त्यांच्या कामाचा दर्जा चव्हाट्यावर

अभिजीत सोनावणे

नाशिक - स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवणाऱ्या नाशिक शहरातील सर्वच रस्ते खड्ड्यात गेलेत. शहरातील सर्वच भागातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलंय. मात्र शहरात केवळ ६ हजार २७० खड्डे (Potholes) असल्याचा अजब दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यातील ३ हजार ६०० खड्डे तातडीने बुजवण्यात आल्याचा दावाही प्रशासनाकडून करण्यात आला असून येत्या ४ दिवसांत उर्वरित खड्डेही पेव्हर ब्लॉकच्या मदतीने बुजवून तात्पुरती डागडुजी केली जाईल, असं पालिका आयुक्त रमेश पवार यांनी म्हटलं आहे.

हे देखील पाहा -

मात्र प्रत्यक्षात नाशिकमधील (Nashik) रस्त्यांवर यापेक्षा जास्त खड्डे पडल्याचा दावा केला जात आहे. तर ३ वर्षांच्या आत खड्डे पडलेल्या रस्त्यांचं काम करणाऱ्या ७ ठेकेदारांना पालिकेकडून नोटिसाही बजावण्यात आल्यात. विशेष म्हणजे अगदी वर्षभरापूर्वी बांधलेल्या नव्या रस्त्यांवरही खड्डे पडत असल्यानं रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

दरवर्षी रस्त्यांच्या कामावर कोट्यावधींचा खर्च होऊनही पावसाळा सुरू झाला की शहरातील रस्ते खड्ड्यात जात असल्यानं रस्त्यांच्या कामाचा आणि खड्डे भरण्याच्या ठेक्याच्या माध्यमातून काही एजंट नगरसेवक, पालिका अधिकारी आणि ठेकेदारांकडून कोट्यावधींची मलई लाटली जात असल्याचा आरोप करण्यात येतोय. याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचं माजी महापौर दशरथ पाटील यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT