शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पदी आनंदराव पवारच कायम राहणार - एकनाथ शिंदे

बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी आपण एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राहणार असल्याचेही आनंदराव पवार यांनी सांगितले.
Sangli News
Sangli NewsSaam Tv

सांगली - गेल्या महिनाभरात राज्यात झालेल्या सत्ता नाट्याचा परीणाम शिवसेना संघटनेवरही झाला. सांगली (Sangli) जिल्हा प्रमुख, इस्लामपूर नगरपालिकेचे नगरसेवक आनंदराव पवार यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना उघडपणे समर्थन दिले. आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत शिवसैनिकांवर होणारा अन्याय आणि विरोधी पक्षाकडून होणारी गळचेपी ही वस्तुस्थिती दाखवत आणि या सगळ्या अडचणींवर एकनाथ शिंदेच पदाधिकारी आणि शिवसैनिकांना न्याय देतील या भावनेतून एकनाथ शिंदे यांना राज्यात पहील्यांदाच संघटना पातळीवरील पहीला जाहीर पाठींबा दिला.

हे देखील पाहा -

तर एकनाथ शिंदे यांच्या कडून दोन दिवसांपूर्वी ठाण्याच्या जिल्हा प्रमुखांची निवड कायम करण्यात आली. तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सोबत कायम असणारे आणि निकटवर्तीय असणारे आनंदराव पवार बापू यांनाच जिल्हाप्रमुख म्हणून संपूर्ण जिल्हाभर जोमाने कामाला लागून संघटन मजबूत करण्यासाठी कार्यरत राहण्याचे आदेश दिले. हाॅटेल ट्रायडन्ट, मुंबई येथे झालेल्या बैठकी मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री,आमदार उदय सामंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत घोषणा करत पुष्पगुच्छ देऊन आनंदराव पवार यांना शुभेच्छाही दिल्या.

Sangli News
Jalna Crime : 20 हजारांची लाच घेताना उपविभागीय भूसंपादन अधिकारी रंगेहाथ पकडला

सांगलीत शिवसेनेला मोठा धक्का देत काही दिवसांपूर्वी आनंदराव पवार यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात दखल झाले. त्यानंतर शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पदीआनंदराव पवारच कायम राहणार असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी आपण एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राहणार असल्याचेही आनंदराव पवार यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com