Manmad News Saam tv
महाराष्ट्र

Manmad News : रात्रीच्या वेळी भर रस्त्यात प्रसुतीकळा; तृतीयपंथीयाच्या मदतीने सुखरुप झाली प्रसुती

Nashik Manmad News : ऊसतोड मजूर मंगला चव्हाण ही गर्भवती महिला आपल्या सासू सासऱ्यांसह अहमदनगर येथून दुचाकीवरुन नांदगाव येथे येत होती. रात्रीच्या सुमारास नांदगाव रेल्वे गेटजवळ पोहचले असताना अचानक तीला प्रसुतीकळा येऊ लागल्या

Rajesh Sonwane

अजय सोनवणे
मनमाड (नाशिक)
: नाशिकच्या नांदगाव तालूक्यातील माहेर वासीन असलेल्या गर्भवती ऊसतोड मजूर (Nashik) महिला दुचाकीवरून जात असताना रस्त्यातच तिची प्रसूती झाली. ही घटना रात्रीच्या सुमारास (Nandgaon) नांदगाव रेल्वे गेटजवळ घडली. (Breaking Marathi News)

ऊसतोड मजूर मंगला चव्हाण ही गर्भवती महिला आपल्या सासू सासऱ्यांसह (Ahmednagar) अहमदनगर येथून दुचाकीवरुन नांदगाव येथे येत होती. रात्रीच्या सुमारास नांदगाव रेल्वे गेटजवळ पोहचले असताना अचानक तीला प्रसुतीकळा येऊ लागल्या. यानंतर सासरे सुदाम चव्हाण यांनी दुचाकी बाजूला उभी केली. याच वेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या एका तृतीयपंथीयाने क्षणाचा विलंब न करता तेथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदत घेत स्वतःची साडी सोडून कपडे आडवे लावत महिलेची प्रसुती केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोघेही सुखरूप 

यानंतर तातडीने ग्रामीम रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. कर्मचारी तात्काळ तेथे हजर होऊन त्यांनी बाळ आणि आईची सावकाशपणे नाळ कापून प्रसुत महिलेला आणि आईला पुढील उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. तृतीयपंथाने व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने रस्त्यात प्रसुती झालेल्या या महिलेला गोंडस कन्यारत्न झाले असून सासरे सुदाम चव्हाण यांनी या सर्वांचे मनापासून आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

Maharashtra News Live Update:लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई अन् जिंकली मॅरेथॉनची ‘दौड’

मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

Indian Railways: भारतातील ही 3 स्टेशनं मानली जातात सर्वात घाणेरडी, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन आहे का यादीत?

SCROLL FOR NEXT