Railway Crime Saam tv
महाराष्ट्र

Railway Crime : मनमाडला रेल्वे वॅगनमधुन इंधन चोरी; सहा रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक

Nashik News : नाशिकच्या मनमाडजवळील पानेवाडी इंधन प्रकल्पातून रेल्वेद्वारे इंधन वाहतूक करण्यासाठी इंधन कंपनीच्या परीसरात असलेल्या रेल्वे इंधन धक्क्यात उभी होती. येथूनच रेल्वे वॅगन मधुन इंधन चोरी केली जात होती

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 
मनमाड (नाशिक)
: इंधनने भरलेल्या रेल्वे वॅगनमधून इंधनची धोरि केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार नाशिकच्या मनमाड येथे समोर आला असून रेल्वे कर्मचाऱ्यांकडूनच हि चोरी केली जात असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 

नाशिकच्या (Nashik) मनमाडजवळील पानेवाडी इंधन प्रकल्पातून रेल्वेद्वारे इंधन वाहतूक करण्यासाठी इंधन कंपनीच्या परीसरात असलेल्या रेल्वे इंधन धक्क्यात उभी होती. येथूनच रेल्वे वॅगन मधुन इंधन चोरी केली जात होती. याठिकाणी ऑनड्युटी असलेल्या ६ रेल्वे कर्मचाऱ्यांकडून पेट्रोल व डिझेल चोरी केली जात होती. (Railway) रेल्वे वॅगनमधून इंधन काढत असताना या कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने ताब्यात घेत त्यांच्याकडून ४० लिटर डिझेल, पेट्रोल तसेच इंधन चोरीसाठी वापराण्यात येणारी प्लास्टिक कॅन, बाटली यासह मोटार सायकल जप्त करण्यात आल्या. 

रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने संबंधितांकडून ताब्यात घेतलेले डिझेल ३ हजार २७६ रुपयांचे तर (Petrol) पेट्रोल १ हजार १२४ असे एकूण ४ हजार ४०० रुपयांचे इंधन जप्त (Manmad) केले आहे. या प्रकरणी रेल्वेतील परिचालक प्रवीण सयाजी शिंदे (रा. नांदगाव, नाशिक), अजय धूप सिंग यादव उत्तरप्रदेश), गोकुळ कृष्ण सुरसे (नांदगाव, नाशिक), सिध्देश्वर उल्हास शहरकर (मनमाड), हेल्पर शुभम लक्ष्मण तुरकने (मनमाड), रवीद्र निवृत्ती आहेर (नांदगाव) यांना ताब्यात घेतले आहे. यां घटनेने इंधन चोरीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. मात्र या कारवाईबाबत मोठी गुप्तता पाळली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून गेवराई नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर

Mahabharat: महाभारताचे पुरावे सापडले? कुरुक्षेत्रात सापडला रथ, महाकाय गदा?

Maharashtra Politics: सुजय विखेंनी दिले वडिलांना राजकारणाचे धडे,'विरोधकांपेक्षा गाडीत बसणाऱ्यांपासून सावध राहा'

Buldhana Crime: सकाळी-सकाळी डोकं फिरलं, सपासप कुऱ्हाडीने वार करत आई-बाबाला संपवलं; नंतर स्वतःला लावला फास

Maharashtra Politics: भाजप कुबड्या काढणार? भाजप अजितदादा-शिंदेंना रोखणार?

SCROLL FOR NEXT