Nashik Malegaon News Saam tv
महाराष्ट्र

Nashik : ग्रामपंचायत कराची रक्कम थकीत; रावळगाव शुगर चॉकलेट कारखाना सील

Nashik Malegaon News : ग्रामपंचायतीच्या कराची रक्कम थकविल्याने रावळगाव शुगर फॅक्टरीवर जप्तीची कारवाई करत शुगर आणि चॉकलेट कारखाना ग्रामपंचायतकडून सील करण्यात आला आहे.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 
नाशिक
: ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शुगर व चॉकलेट कारखान्याकडे मागील काही वर्षांच्या कराची रक्कम थकीत आहे. वारंवार नोटीस दिल्यानंतर देखील ग्रामपंचायतीचा थकीत कर भरण्यास कारखान्याकडून दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे अखेर आज रावळगाव ग्रामपंचायतीने या कारखान्याला सील लावण्यात आले आहे. कारखान्याच्या गेटला कुलूप लावून सील लावण्यात आले आहे. 

नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर देशाचे वैभव असलेल्या मालेगाव तालुक्यातील रावळगावच्या शुगर व चॉकलेट कारखान्यावर ग्रामपंचायतीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या कारखान्याकडे मागील काही वर्षांपासून कराची रक्कम थकलेली आहे. साधारण हि रक्कम दोन कोटी रुपयांची थकबाकी आहे. याबाबत वारंवार नोटीसा देण्यात आल्या होत्या. मात्र कारखाना प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात होते. 

गेटला कुलूप ठोकत लावले सील 

ग्रामपंचायतीला गावातील विकास कामांकडे निधी नसल्याने थकबाकी मिळावी; अशी वारंवार मागणी करुन देखील थकबाकी मिळत नसल्याने अखेर कारखान्याच्या गेटला सील करण्यात आले आहे. सील लावण्यापूर्वी ग्रामपंचायतीकडून अखेरची नोटीस देण्यात आली होती. यानंतर सदरची कारवाई ग्रामपंचायतीकडून करण्यात आली असून कारखान्याला सील लावण्यात आले आहे. 

ग्रामपंचायतीची ठाम भूमिका 
जवळपास दोन कोटींची ग्रामपंचायतीची थकबाकी आहे. वारंवार नोटिस देऊनही काहीही पूर्तता करण्यात न आल्याने रावळगाव ग्रामपंचायतीने हे पाऊल उचलले आहे. दरम्यान पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रकरण पाठवण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान ग्रामपंचायत कराची रक्कम घेण्यावर मात्र ठाम असून रक्कम भरल्याशिवाय सील काढणार नसल्याची भूमिका ग्रामपंचायतीची आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Expert Opinion: बुरशी लागलेला कांदा खाताय, सावधान! कांद्यात जीवघेणं ब्लॅक फंगस?

Maharashtra Live News Update : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट कडून शेतकऱ्यांना १ कोटी २५ लाख रुपयांची मदत

Nobel Prize Winners 2025: असाध्य आजारांवर उपचार शोधला; ३ शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक जाहीर, जाणून घ्या नावे...

Pune Politics : पुण्यात महायुतीमध्ये मिठाचा खडा; धंगेकर-रासने पुन्हा आमनेसामने, नेमकं काय बिनसलं?

Weekly Horoscope 'या' राशींची पैशाची चिंता मिटून व्यवसायातून चांगला नफा मिळेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT