Maharashtra CM Devendra Fadnavis addressing saints during Nashik visit, unveiling ₹35,000 crore Kumbh Mela development roadmap. Saam tv
महाराष्ट्र

नाशिक कुंभमेळा होणार जगातील सर्वात भव्य! फडणवीसांनी मांडला ३५ हजार कोटींचा रोड मॅप

Nashik Kumbh 2027: नाशिक कुंभमेळा भव्य-दिव्य करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ३५ हजार कोटींचा रोडमॅप; रस्ते, रेल्वे, विमानतळ आणि गोदावरी स्वच्छतेसाठी मोठी योजना.

Omkar Sonawane

नाशिक: यंदाचा कुंभ भव्य-दिव्य करणार मागील कुंभपेक्षा अधिक भाविक आले तरी सर्व सुविधा तयार ठेवणार आहोत. नाशिकमध्ये जागेची मर्यादा असली तरी जास्तीत जास्त जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते आज नाशिक दौऱ्यावर असून अखिल भारतीय संत संमेलनाला संबोधित करताना त्यांनी नाशिकचा 35 हजार कोटींचा रोड मॅप मांडला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सनातन संस्कृतीने सर्व टिकून ठेवले. कित्येक आक्रमणांच्या नंतर ती आजही टिकून आहे. आपली महाराष्ट्राची वारकरी संप्रदाय परंपरा आहे. औरंगजेबाने किती अडचणी आणल्या तरी आपली वारी परंपरा सुरू आहे. संतांच्या विचारांनी फक्त स्नान नाही तर आपले मन देखील शुद्ध होते. यासाठी कुंभमेळा महत्वाचा आहे. सर्व संत महंतांनी आम्हाला आपलेसे केले आहे. त्यामुळे यंदाचा कुंभ भव्य दिव्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रस्ते, रेल्वे आणि विमानतळ सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. गोदावरी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार असून त्र्यंबकेश्वर येथे वर्षभर पाणी वाहत राहील यासाठी देखील काम सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

साधूग्रामसाठी मोठा निर्णय

आतापर्यंत साधूग्रामसाठी शेतकऱ्यांकडून भाडे तत्वावर जमीन घेतली जात होती. मात्र आता ती जमीन थेट खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

Maharashtra News Live Update: पुण्यात चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार प्रकरणात दोन आरोपी ताब्यात

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

Chhatrapati Sambhajinagar Tourism: छत्रपती संभाजीनगरपासून फक्त ६ तासांच्या अंतरावर आहे हे मनमोहक हिल स्टेशन, या विकेंडला प्लान कराच!

SCROLL FOR NEXT