Alu Vadi Recipe: आज दुपारच्या जेवणासाठी घरच्या घरी झटपट बनवा स्वादिष्ट खमंग अळू वडी, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

८ ते १० अळूची मोठी पाने, २ कप बेसन, १ चमचा लाल तिखट, १/२ चमचा हळद, १ चमचा धणे-जिरे पूड, चिंचेचा कोळ, गूळ, मीठ आणि पाणी घ्या.

Alu Vadi Recipe | Google

बेसनाचे मिश्रण बनवा

एका भांड्यात बेसन घेऊन त्यात तिखट, हळद, धणे-जिरे पूड, मीठ, चिंचेचा कोळ आणि किसलेला गूळ घाला. थोडे थोडे पाणी घालून घट्ट पेस्ट तयार करा.

Alu Vadi Recipe | Google

अळूची पाने स्वच्छ धुवा

अळूची पाने नीट धुऊन कोरडी करा. पानांचे जाड देठ आणि शिरा हलक्या हाताने काढून टाका.

Alu Vadi Recipe | Google

पानांवर मिश्रण लावा

एक पान पसरवून त्यावर बेसनाचे मिश्रण लावा. त्यावर दुसरे पान ठेवून पुन्हा मिश्रण लावा. अशा प्रकारे ३ ते ४ पानांचे थर तयार करा.

Alu vadi | google

रोल करून वाफवा

तयार पानांचा घट्ट रोल करा. हा रोल स्टीमरमध्ये किंवा कुकरमध्ये (शिट्टी न लावता) 20 ते 25 मिनिटे वाफवून घ्या.

Alu vadi | google

काप करून फोडणी द्या

वाफवलेला रोल थंड झाल्यावर गोल काप करा. कढईत तेल गरम करून त्याला तळून घ्या.

Alu Vadi | Canva

गरमागरम सर्व्ह करा

तयार अळूवडीवर कोथिंबीर आणि किसलेले खोबरे भुरभुरवा. चहा किंवा जेवणासोबत गरमागरम सर्व्ह करा.

Skin Care: चेहऱ्यावर पिंपल्स आणि डाग खूप झालेत? मग हा मास्क तुमचे सगळे प्रॉब्लेम्स करतील दूर

Skin Care | Saam TV
येथे क्लिक करा