Shruti Vilas Kadam
१ ते २ चमचे चंदन पावडर घ्या. त्यामध्ये आवश्यकतेनुसार कच्चे दूध मिसळून गुळगुळीत पेस्ट तयार करा. ही पेस्ट स्वच्छ चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. १५ ते २० मिनिटे सुकू द्या.त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा.आठवड्यातून २ ते ३ वेळा हा फेस पॅक वापरू शकता.
चंदन आणि दूध त्वचेतील निस्तेजपणा कमी करून चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणण्यास मदत करतात.
सूर्यप्रकाशामुळे झालेला टॅन कमी करण्यासाठी हा फेस पॅक उपयुक्त ठरू शकतो. त्वचा अधिक स्वच्छ आणि तजेलदार दिसते.
चंदनामध्ये शीतल गुणधर्म असतात. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेला आराम मिळतो आणि जळजळ कमी होण्यास मदत होते.
चंदनातील नैसर्गिक गुणधर्म त्वचेतील सूज आणि लालसरपणा कमी करण्यास सहाय्यक ठरू शकतात.
दुधातील लॅक्टिक अॅसिड आणि पोषक घटक त्वचेला आवश्यक ओलावा देतात, त्यामुळे त्वचा अधिक मऊ वाटते.
हा फेस पॅक त्वचेवरील मृत पेशी कमी करून त्वचा अधिक स्वच्छ आणि ताजी दिसण्यास मदत करतो.
नियमित वापर केल्यास चेहऱ्यावरील हलके डाग आणि त्वचेचा असमान रंग कमी होण्यास मदत मिळू शकते.