Hair Care: केसांना पोषण आणि शाईन पाहिजे? मग ट्राय करा 'हा' घरी तयार केलेला हेअर मास्क

Shruti Vilas Kadam

केसांना भरपूर प्रोटीन मिळते

अंड्यात प्रोटीन मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळून केस मजबूत होण्यास मदत होते.

Hair Care | Saam Tv

केस गळणे कमी होण्यास मदत

अंडी आणि दह्यातील पोषक घटक केसांच्या मुळांना बळकट करतात, ज्यामुळे केस तुटणे आणि गळणे कमी होऊ शकते.

Hair Care | Saam tv

केसांना नैसर्गिक चमक मिळते

दह्यातील नैसर्गिक घटक केसांचा कोरडेपणा कमी करून त्यांना मऊ आणि चमकदार बनवतात.

Hair care | Saam Tv

कोंड्याची समस्या कमी करण्यास मदत

दह्यामध्ये असलेले गुणधर्म टाळू स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे कोंडा आणि खाज कमी होऊ शकते.

Hair Care | Saam tv

कोरड्या केसांसाठी फायदेशीर

हा हेअर मास्क केसांना खोलवर मॉइश्चर देतो. त्यामुळे कोरडे आणि निस्तेज केस अधिक मऊ वाटतात.

Hair Care | Saam tv

फ्रिझी केस नियंत्रणात ठेवतो

अंडी आणि दह्याचा मास्क केसांना स्मूथ बनवतो, ज्यामुळे फ्रिझी आणि विस्कटलेले केस नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

Hair Care

केसांचा पोत सुधारतो

नियमित वापरामुळे केस अधिक निरोगी, मजबूत आणि व्यवस्थित दिसू शकतात.

Hair Care

अंडी आणि दह्याचा हेअर मास्क कसा वापरावा?

1 अंडे, 3 ते 4 चमचे दही. एका भांड्यात अंडे आणि दही एकत्र करून चांगले फेटून घ्या. तयार मिश्रण केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावा. 30 ते 40 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून एकदा हा मास्क वापरू शकता.

Hair Care | Saam Tv

Copper Bottle Side Effects: तांब्याच्या बाटलीत या ५ गोष्टी कधीही ठेवू नका; फायद्याऐवजी होईल मोठे नुकसान

Copper Bottle
येथे क्लिक करा