Shruti Vilas Kadam
लिंबूमधील सायट्रिक अॅसिड तांब्याशी प्रतिक्रिया देऊ शकते. त्यामुळे तांब्याचे अंश पेयामध्ये मिसळण्याचा धोका वाढतो.
संत्रा, मोसंबी, अननस यांसारख्या आंबट फळांच्या रसामध्ये आम्लाचे प्रमाण जास्त असते. हे रस तांब्याच्या बाटलीत ठेवणे टाळावे.
ताक, लस्सी किंवा दह्यापासून बनवलेली पेये तांब्याच्या संपर्कात आल्यास त्यांची गुणवत्ता बदलू शकते आणि पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो.
व्हिनेगर, सफरचंद व्हिनेगर किंवा इतर आम्लयुक्त पेये तांब्याच्या बाटलीत ठेवणे सुरक्षित मानले जात नाही.
सोडा, कोल्ड ड्रिंक्स किंवा इतर कार्बोनेटेड पेयांमधील घटक तांब्याशी प्रतिक्रिया देऊ शकतात. त्यामुळे अशा पेयांसाठी स्टील किंवा काचेची भांडी वापरणे अधिक योग्य ठरते.
तांब्याच्या बाटलीचा सर्वाधिक फायदा साधे पाणी ठेवूनच मिळतो. रात्रीभर पाणी ठेवून सकाळी पिणे ही सर्वसाधारण पद्धत आहे.
तांब्याच्या बाटलीवर ऑक्सिडेशनचा थर जमा होऊ शकतो. त्यामुळे लिंबू आणि मीठ किंवा योग्य क्लिनरने बाटली नियमित स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.