एलॉन मस्क यांनी रचला इतिहास, मस्क बनले जगातील पहिले ट्रिलिनियर

Elon Musk First Trillionaire Wealth 11 Trillion: एल़ॉन मस्क हे जगातील पहिले ट्रिलिनियर झालेत... त्यामुळे मस्क यांची संपत्ती किती झालीय? जगातील 4 अब्जाधीक्षांच्या एकूण संपत्तीपेक्षाही मस्क यांची श्रीमंती कशी वाढलीय.? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Elon Musk crosses $1.1 trillion net worth, becoming the world’s first trillionaire
Elon Musk crosses $1.1 trillion net worth, becoming the world’s first trillionairesaam tv
Published On

जगभरात आज एकाच नावाची चर्चा आहे—एलॉन मस्क... स्पेसएक्स कंपनीनं शेअर बाजारात असा काही धमाका केला की, एलॉन मस्क हे इतिहासातील पहिले 'ट्रिलियनर' बनलेत...त्यांची एकूण संपत्ती 1.1 ट्रिलियन डॉलर्स म्हणजे अंदाजे 92 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचलीय..थोडक्यात काय, तर गुगल, अॅमेझॉन आणि ओरॅकलच्या मालकांची एकत्रित संपत्ती एका तराजूत आणि एलॉन मस्क यांची संपत्ती दुसऱ्या तराजूत ठेवली, तरी मस्क यांचेच पारडे 1 अब्ज डॉलरनं जड आहे...मस्क यांच्या संपत्तीची तुलना देशाच्या अर्थव्यवस्थेशी केली तर डोळे चक्रावून टाकणारे आकडे समोर येतील...

सध्या जगात फक्त 21 देशांचा वार्षिक जीडीपी 1 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ, मस्क हे जगातील तब्बल 174 देशांच्या वार्षिक आर्थिक उत्पन्नापेक्षा अधिक श्रीमंत आहेत.

आशियातील सर्वात मोठे तंत्रज्ञान केंद्र मानल्या जाणाऱ्या तैवान देशाचा वार्षिक जीडीपी 976.7 अब्ज डॉलर्स आहे. त्यामुळे मस्क यांची संपत्ती तैवानच्या एकूण अर्थव्यवस्थेपेक्षाही मोठी आहे.

विशेष म्हणजे मानवी बुद्धीला अकल्पनीय वाटणारी ही संपत्ती जर मस्क यांनी पृथ्वीवरील प्रत्येक नागरिकाला समान वाटायची ठरवली तर जगातील प्रत्येक व्यक्तीला तब्बल 10 हजार 300 रुपये मिळू शकतील.

दरम्यान मस्क यांच्याकडे असणारा हा पैशांचा डोंगर भारताचे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या तुलनेत किती जास्त आहे? पाहूयात...

गौतम अदानी यांच्यापेक्षा जवळपास 9 पट अधिक संपत्ती मस्क यांच्याकडे आहे. मुकेश अंबानी यांच्यापेक्षा जवळपास 10 पट अधिक संपत्ती एकट्या मस्क यांच्या तिजोरीत जमा झालीय....

दरम्यान ब्लूमबर्ग बिलियनिअर्स इंडेक्सनुसार, मस्क यांची श्रीमंती इतकी आहे की जगातील चार टॉप अब्जाधीशांची एकूण संपत्ती एकत्र केली, तरी मस्क सरस ठरतात....

अब्जाधीश कंपनी अंदाजित संपत्ती

1. लॅरी पेज गुगल 303 अब्ज डॉलर्स

2. सर्गेई ब्रिन गुगल 282 अब्ज डॉलर्स

3. जेफ बेझोस अॅमेझॉन 260 अब्ज डॉलर्स

4. लॅरी एलिसन ओरॅकल 254 अब्ज डॉलर्स

एकूण संपत्ती 1,099 अब्ज डॉलर्स

एलॉन मस्कची संपत्ती- 1,100 अब्ज डॉलर्स+

मुळात रॉकेट्स, टेस्लासारख्या इलेक्ट्रिक कारर्स , स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या जोरावर एलॉन मस्क यांनी हे साम्राज्य उभं केलयं.... मस्क यांचे हे यश केवळ व्यावसायिक नसून, त्यांनी जागतिक अर्थकारणाचा इतिहासच बदलून टाकलाय... हे निश्चित....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com