Ashok Kharat Saam tv
महाराष्ट्र

Kharat Case : कॅप्टन खरातचे ते ५६ व्हिडिओ कुणी बाहेर आणलं, समोर आले नाव

Nashik Kharat scandal 58 video clips controversy : नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा झाला. ऑफिस बॉयनेच ५८ व्हिडिओ क्लिप्स बाहेर आणल्याची माहिती समोर आली आहे. एसआयटी तपासात या घटनेमुळे मोठी कलाटणी मिळाली आहे.

Namdeo Kumbhar

Ashok Kharat case office boy CCTV footage leak details : नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे अन् धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशोक खरात याची सध्या एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. त्याचं बिंग कसं फुटलं? याची चर्चा सध्या नाशिकसह राज्यात सुरू आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या स्वंयघोषित कॅप्टनचे काळे कारनामे उघड होण्यामागे त्याच्याच कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा हात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ऑफिस बॉयनेच खरातच्या कृत्यांचे बिंग फोडले आहे. खरात प्रकरण बाहेर आल्यानंतर संपूर्ण राज्य हादरले आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत.

अशोक खरातचे 'प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स' नावाचे कार्यालय आहे. याच ठिकाणी त्याने अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा संशय आहे. खरातच्या नकळत त्याचा ऑफिस बॉय नीरज जाधव यानं सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेतले होते. त्यानेच हे व्हिडिओचा वापर केल्याचे बोलले जातेय. ऑफिस बॉयमुळेच अशोक खरात याचे बिंग फुटल्याची माहिती समोर आली आहे. अशोक खरातने खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे आणि ऑफिस बॉयने हे प्रकरण बाहेर काढल्यामुळे खरातचे कृत्य जगासमोर आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ऑफिस बॉय नीरज जाधव याच्यामुळे खरातच्या महिलांवरील अत्याचाराच्या तब्बल ५६ क्लिप्स बाहेर आल्याची माहिती समोर आली. डिसेंबर २०२५ मध्ये ऑफिस बॉयने या फुटेजच्या आधारे अशोक खरातला ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, खरातने खंडणी देण्यास नकार दिला आणि जाधव याच्याविरोधात वावी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.

अशोक खरातने खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे आणि ऑफिस बॉयने हे प्रकरण बाहेर काढल्यामुळे खरातचे कृत्य जगासमोर आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, नीरज जाधव आणि त्याचे साथीदार पीडित महिलांना सातत्याने संपर्क साधून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करत होते, असेही समोर आले आहे. जानेवारीमध्ये शिर्डीतील एका महिलेला नीरज जाधवने काही आक्षेपार्ह फोटो पाठवले होते. त्यानंतर त्या महिलेने शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.फेब्रुवारी २०२६ मध्ये या तक्रारीनंतर तपास सुरू झाला आणि खरातच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price: मुंबईत पेट्रोल ५ रुपये स्वस्त दराने मिळणार; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

SCROLL FOR NEXT