Nashik News  Saam tv
महाराष्ट्र

'नाहीतर डेडबॉडी सिव्हिलला भेटेल'; भाई, नानानंतर आता तरुणींची सोशल मीडियावर 'ताईगिरी'; नाशिक पोलिसांकडून कायद्याचा दणका

Nashik News : भाई, नानानंतर आता तरुणींची सोशल मीडियावर 'ताईगिरी' समोर आली आली आहे. मात्र, या तरुणींना नाशिक पोलिसांकडून कायद्याचा दणका देण्यात आला आहे.

Vishal Gangurde

नाशिकच्या दोन तरुणींनी तयार केला गुन्हेगारी स्टाईलचा रील

रील व्हायरल झाल्यानंतर तरुणींना नाशिक पोलिसांकडून दणका

नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिसांकडून कारवाई

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिक पोलिसांनी शहरात कारवाईचा धडाका लावला आहे. सोशल मीडियावर गुन्हेगारी स्टाईल्स रिल्स करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचं काम नाशिक पोलि‍सांकडून केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी गुन्हेगारी स्टाइल रिल्स तयार करणाऱ्या तरुणांना दणका दिला होता. त्यानंतर आता याच पद्धतीने दोन तरुणींचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या तरुणींना देखील नाशिक पोलिसांनी दणका दिला आहे.

नाशिकमध्ये गुन्हेगारी स्टाइल रिल्स तयार करणं दोन तरुणींच्या चांगलंच अंगलट आलं आहे. गुन्हेगारी स्टाइल रिल्स तयार करून व्हायरल करणाऱ्या तरुणींचा माज पोलिसांनी उतरवला आहे. नाशिकच्या रामकुंड परिसरात दोन्ही तरुणींनी रील तयार केला होता. तरुणी रील तयार करताना म्हणत आहे की, हे नाशिक आहे भावा, इथे तू इज्जत दिली तर तुला इज्जत भेटेल, नाहीतर तुझी डेडबॉडी थेट सिविलला भेटेल'.

दोन्ही तरुणींचा गुन्हेगारी स्टाईल रील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. गुन्हेगारी स्टाईल्स रिल्स करणाऱ्या दोन्ही तरुणींना देवळाली कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी माज उतरवल्यानंतर दोन्ही तरुणींनी माफीनामा सादर केला.

सातपूर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट

नाशिकच्या सातपूर गोळीबार प्रकरणात मोठे अपडेट समोर आली आहे. माजी नगरसेवक प्रकाश लोंढेच्या कार्यालयातील भुयारात शस्त्र सापडले. त्याच्या भुयारात दोन कुऱ्हाडी, एक चाकू पोलिसांनी जप्त केला. दुसरीकडे फरार भूषण लोंढेच्या मागावर परराज्यात चार पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. प्रकाश लोंढेच्या अनधिकृत मालमत्तांवर नाशिक मनपा हातोडा चालवणार आहे. अपहरण झालेल्या डॉक्टरांसह कुटुंबांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp Scam: व्हॉट्सअ‍ॅपवर दिवाळी ऑफरचे मेसेज येतात? सावधान, अशी घ्या काळजी, अन्यथा...VIDEO बघा

Maharashtra Live News Update: राड्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे उद्या पुण्यात

Diwali Bonus: राज्यातील 'या' सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची धन धन दिवाळी; मिळाला २० वर्षातील सर्वाधिक बोनस

Crime : काम देतो म्हणत नेलं, सामूहिक अत्याचारानंतर बेदम मारलं; अमानुष छळामुळे आदिवासी महिलेचा मृत्यू

Sharad Pawar: निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांनी नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र दिला? बघा VIDEO

SCROLL FOR NEXT