
बिहार विधानसभा निवडणुकीआधी RJD ला मोठा धक्का
नवादा व रजौली येथील आमदार विभा देवी व प्रकाश वीर यांचा राजीनामा
दोन्ही आमदारांकडून भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे जाहीर
आता RJD चा प्रभाव नवादा जिल्ह्यात कमी होण्याची शक्यता
RJD MLA Resigns : बिहार विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रीय जनता दल, माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना मोठा धक्का बसला आहे. नवादा आणि रजौली विधानसभा मतदारसंघातील आमदार विभा देवी आणि प्रकाश वीर यांनी पक्षाचा राजीनामा घेतला आहे. दोन्ही आमदारांनी विधानसभा अध्यक्ष नंद किशोर यादव यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. दोन्ही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
राष्ट्रीय जनता पक्षातील अंतर्गत वाद आणि नेतृत्वामुळे राजीनामा देत असल्याचे दोन्ही आमदारांनी सांगितलं आहे. एकीकडे तेजस्वी यादव यांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. त्यात नवादा जिल्हा आरजेडीचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र, नवादा येथील आमदाराने राजीनामा दिल्याने जिल्ह्यातील आरजेडीचा प्रभाव कमी होत असल्याचं बोललं जात आहे. विभा देवी आणि प्रकाश वीर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रीय जनता दलाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने चांगली कंबर कसली आहे. बड्या नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केल्याने नवादा जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही आमदाराच्या राजीनाम्यावर राष्ट्रीय जनता दलाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर तडजोडीचं राजकारण सुरु झालं आहे. बिहारमध्ये अद्याप एनडीए आणि इंडिया आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला फायनल झालेला नाही. बिहारमध्ये ६ नोव्हेंबर रोजी १२१ विधानसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील मतदान होईल. तर ११ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात १२२ विधानसभा मतदारसंघात मतदान होईल. या निवडणुकीची मतमोजणी १४ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर दरम्यान पूर्ण होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.