Rescue teams recover bodies after four individuals drowned in Gangapur Dam, Nashik, triggering grief in Savargaon village. saam tv
महाराष्ट्र

उन्हापासून दिलासा मिळवायला गेले, पण काळाने घातला घाला; गंगापूर धरणात चार मुलांचा बुडून मृत्यू

Gangapur Dam Drowning Nashik Four Dead: नाशिकच्या गंगापूर धरणात पोहण्यासाठी गेलेल्या चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सावरगावातील तिघे अल्पवयीन मुलं आणि एका महिलेचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

Omkar Sonawane

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिकमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार जणांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन अल्पवयीन मुल आणि एका 21 वर्षीय विवाहित महिलेचा समावेश आहे. या भीषण दुर्घटनेमुळे नाशिकमध्ये आणि सावरगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण गंगापूर धरणाच्या जलाशयात उतरले होते. मात्र पाण्याचा खोलीचा आणि वेगाचा अचूक अंदाज न आल्यामुळे चौघेही पाण्यात बुडाले. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

मृतांची नावे खालीलप्रमाणे:

निखिल मच्छिंद्र गोतरणे (वय १६ वर्षे, रा. सावरगाव)

गणेश सुरेश गोतरणे (वय १६ वर्षे, रा. सावरगाव)

साहिल मनोहर गोतरणे (वय १६ वर्षे, रा. सावरगाव)

मयुरी पवन जाधव (वय २१ वर्षे, माहेर: त्र्यंबकेश्वर, सासर: सावरगाव)

मृत्यू झालेले तिन्ही तरुण आणि महिला हे गंगापूर धरणाजवळच असलेल्या सावरगाव येथील रहिवासी होते. उन्हाचा कडाका किंवा फिरण्याच्या उद्देशाने हे सर्वजण धरणावर गेले असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. धरणाच्या पात्रात उतरल्यानंतर अचानक पाण्याचा अंदाज चुकल्याने एकाला वाचवताना दुसरे, अशा पद्धतीने चौघेही जण बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. एकाच गावातील चार तरुण सदस्यांचा अशा प्रकारे अंत झाल्याने सावरगाव परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत असून, सर्वत्र शांतता पसरली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे-सोलापूर महामार्गावर टेम्पोला आग

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सर्वात मोठा खुलासा! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल; मेसेज वाचून अंगावर येईल काटा

HSRP Number Plate: महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट नाही? आजपासून थेट ₹1,000 दंड; सरकारचा इशारा

Monsoon Health Care: पावसाळ्यात आजारी पडायचं नाही? मग हे पदार्थ पुढचे तीन महिने खाणं टाळा

मुंबईत'हिट अँड रन'चा थरार! मध्यरात्री टँकरने डिलिव्हरी बॉयला चिरडले

SCROLL FOR NEXT