DA Hike: मोठी बातमी! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्त्यात वाढ

Dearness Allowance increase: राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्यात आला आहे.

देशभरामध्ये वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. या महागाईमुळे नागरिकांच्या खिशावर ताण येत असून घराचे बजेट कोलमडत आहे. दूध, भाज्या, धान्य, पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीमध्ये सतत वाढ होत आहे. या महागाईच्या काळात राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सराकरी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.

राज्य सरकारी कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्यात आला आहे. वाढीव महागाई भत्ता १ जुलै २०२५ पासून लागू करण्यात आला आहे. याआधी जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील थकबाकी देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. आता सरकारने १ नोव्हेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या तीन महिन्यांच्या महागाई भत्ता थकबाकीबाबतही निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना ही थकबाकी मे २०२६ च्या पगारासोबत मिळणार आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातवरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com