Nashik FIR Against Ex-Minister Raosaheb Danve’s Grandson Saam
महाराष्ट्र

माजी मंत्र्यांच्या नातवाचा पाय खोलात; भाजप नेत्याकडून पैसे थकवल्याचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

BJP Leader Kailas Aher Files Complaint Against Raosaheb Danve: माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे नातू शिवम पाटीलसह आठ जणांवर नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Bhagyashree Kamble

अभिजीत सोनावणे, साम टिव्ही

नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे नातू शिवम पाटील यांच्यासह आठ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीच्या शेअरमध्ये भागीदारी करून त्याबदल्यात देण्यात येणाऱ्या रकमेपैकी १० कोटी न दिल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही तक्रार भाजपचे पदाधिकारी आणि उद्योजक कैलास आहेर यांनी नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात केली आहे. कैलास आहेर यांनी आपल्या कंपनीत रावसाहेब दानवे यांचे नातू शिवम पाटील आणि इतर काही जणांना भागीदारी दिल्याचा आरोप केला आहे.

कैलास आहेर कंपनीचे मालक आहेत. त्यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं की, 'माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या सांगण्यावरून मी या व्यक्तींना माझ्या कंपनीत भागीदारी दिली होती. परंतु भागीदारी दिल्यानंतर मला ठरलेले काही पैसे मिळाले नाहीत', असं आहेर यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं.

कैलास आहेर यांच्या म्हणण्यानुसार, रावसाहेब दानवे यांच्या सांगण्यावरून त्यांनी कंपनीचे १४ टक्के शेअर्स दिले होते. या शेअर्सच्या बदल्यात २५ कोटी रूपयांचा व्यवहार ठरला होता. मात्र, त्यापैकी १० कोटी रूपयांचा भरणा अद्याप करण्यात आलेला नाही, अशी माहिती आहेर यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंना शिवीगाळ करणाऱ्या रिक्षाचालकाचा माज काही तासांतच उतरला; कान पकडून मागितली माफी

Mirchi Vada: नाश्त्याला वडापाव कशाला? घरगुती अन् राजस्थान स्टाईल कुरकुरीत मिरची वडा ठरेल बेस्ट ऑप्शन

१० मिनिटांत सोलून होतील किलोभर वाटाणे, फक्त ६ स्टेप्स; जाणून घ्या स्मार्ट ट्रिक

Karnataka Politics : सत्तासंघर्ष पेटला! मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाणार? कर्नाटकात 'डीके बॉस'!

Maharashtra Live News Update : देवळीतील भाजपाची विजय संकल्प सभा

SCROLL FOR NEXT