दिवाळीचं फराळ खाऊन पोट सुटलंय? भाग्यश्रीनं सांगितलं वेट लॉस कॉफी रेसिपी, वजन झरझर घटेल

Bhagyashree Shares Her Secret Bulletproof Coffee Recipe: अभिनेत्री भाग्यश्रीचा आरोग्य सल्ला; दिवाळीनंतर बुलेटप्रूफ कॉफीनं ठेवा फिटनेस कायम. वाचा रेसिपी.
Bhagyashree Shares Her Secret Bulletproof Coffee Recipe
Bhagyashree Shares Her Secret Bulletproof Coffee RecipeSaam
Published On

संपूर्ण राज्यात दिवाळी धुमधडाक्यात पार पडली. दिवाळीत फराळ, मिठाई आणि सुट्टीचा आनंद घेतल्यानंतर लोक पुन्हा आपल्या दिनचर्येत परतले आहेत. दिवाळीत आपल्याला डाईटचा विसर पडतो. यामुळे शरीर लठ्ठ होतं. तसेच गंभीर आजारांचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अभिनेत्री भाग्यश्रीनं अलिकडेच इन्स्टाग्रामवर आरोग्यविषयक सल्ला दिला आहे. पॉवर कॉफीबाबत माहिती दिली आहे.

अभिनेत्री भाग्यश्री अनेकदा जेवण आणि फिटनेस टिप्स शेअर करते. 'टुजडे टिप विथ बी' या इन्स्टाग्राम एपिसोडमध्ये तिनं एक खास पेय शेअर केला आहे. हा पेय आपल्याला वेट लॉससाठी मदत करेल. तिनं सांगितलं की, उत्तम आरोग्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी बुलेटप्रूफ कॉफी पिणे चांगले, असं व्हिडिओत भाग्यश्री म्हणाली.

Bhagyashree Shares Her Secret Bulletproof Coffee Recipe
कुणाची भाषणं होणार? कोण कसं घटनास्थळी पोहोचणार? सत्याच्या मोर्चाबाबत मनसेच्या ज्येष्ठ नेत्याकडून माहिती

भाग्यश्रीनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटलं की, 'दिवाळीत आपल्या तोंडाचा ताबा सुटतो. याचा थेट परिणाम पोटावर होतो. आतडे आणि पोट स्वच्छ करण्यासाठी बुलेटप्रूफ कॉफी उपयुक्त ठरेल. बुलेटप्रूफ कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत. यातून आपल्याला उर्जा, आतडे स्वच्छ आणि मानसिक आरोग्या सुधारण्यास मदत करते. तसेच पचनक्रिया आणि वेट लॉससाठीही मदत करते', अशी माहिती भाग्यश्रीनं दिली.

Bhagyashree Shares Her Secret Bulletproof Coffee Recipe
कोल्हापूरात काँग्रेसला जबरी धक्का; भाजपनं बडा नेता फोडला, राजकीय वर्तुळात खळबळ

भाग्यश्रीनं बुलेटप्रूफ कॉफीची रेसिपी शेअर केली आहे. 'सर्वात आधी एक कप घ्या. कॉफीमध्ये एक चमचा तूप घाला. नंतर त्यात गरम पाणी मिसळा. अशा पद्धतीनं तुमची बुलेटप्रूफ कॉफी तयार'. दिवसाची सुरूवात आपण बुलेटप्रूफ कॉफीनं करू शकता, असं भाग्यश्री म्हणाली. या कॉफीमुळे अधिक वेळ पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे भूक कमी होते. तसेच वेट लॉससाठीही मदत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com