Nashik Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News: मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केल्याने मारहाण करत तरुणाची हत्या; अंबडमधील धक्कादायक प्रकार

Nashik News मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केल्याने मारहाण करत तरुणाची हत्या; अंबडमधील धक्कादायक प्रकार

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: अंबड येथील शिवाजी चौकात टोळक्याने पाठलाग करून एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याचा (Ambad) धक्कदायक प्रकार घडला. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला असून मारहाण केल्याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर अपलोड (Crime News) केल्याच्या रागातून हल्ला केल्याचे उघड झाले आहे. (Latest Marathi News)

नाशिकच्या सिडकोमध्ये संदीप आठवले हा युवक दुचाकीने जात असताना तीन दुचाकीहून आलेल्या सहा जणांनी त्याचा पाठलाग करून त्याची दुचाकी खाली पाडली. यानंतर चोपरने वार केले. यात संदीप आठवले याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आठवड्यात ही तिसरी खूनाची घटना असल्याने अंबडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थाचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनेनंतर मुताच्या नातेवाईकांनी जोपर्यंत हल्लेखोरांना अटक करत नाही, तोपरियांत मूर्तदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली. अंबड पोलिसांनी हल्ला करून खून प्रकरणी पाच संशयितांना तात्काळ अटक केली एक अल्पवयीनला ताब्यात घेण्यात आले आहे.

मनात राग धरून मारहाण 
एकूणच संदीप यांनी एकाला मारहाण करतांनाचे चित्रीकरण केले होते आणि त्याचा विडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. त्याचाच राग मनात धरून काल खटक्यांनी मुख्य आरोपीने आपल्या मित्रांसोबत संदीपवर हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. नाशिकमध्ये सर्रासपणे हत्यारांचा वापर होत असून भररस्त्यात नाशिकमध्ये लोकांच्या समोर हत्याचे लागोपाठ तिन घटना झाल्याने नाशिकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जळगाव जिल्ह्यात उमेदवारी अर्जांची धावपळ

पुण्यात भयंकर घडलं; सिंहगड कॉलेज परिसरात तरूणाची निर्घृण हत्या, कोयत्यानं सपंवलं

Haldi Benefits: लग्नाआधी हळद का लावतात? कारण वाचून थक्क व्हाल

Pune News: पुण्यातील तहसील कार्यालयातून शिवरायांचा पुतळा गायब, शिवप्रेमी आक्रमक|VIDEO

Shocking! मुंबईतील के.व्ही.के शाळेत पुन्हा विषबाधेचा प्रकार; कापूर पडलेल्या तेलात तळले वडे?

SCROLL FOR NEXT