Nashik Crime Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime : रिक्षांची चोरी करून बनावट नंबर प्लेट लावत विक्री; पोलिसांनी सहा रिक्षांसह एकास घेतले ताब्यात

Nashik News : पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून या चोरीच्या रिक्षा नाशिकमध्ये नंबर प्लेट बदलून वापरणारा आणि विक्री करणाऱ्या संशयितास सहा रिक्षांसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: अन्य शहरातून रिक्षा चोरून आणायचा. यानंतर या रिक्षांच्या नंबर प्लेट बदलवून त्या रिक्षा विक्री करण्याचा प्रकार सर्रासपणे सुरु होता. याबाबत काही जणांना शंका आल्याने या प्रकारुबाबत पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी याची शहानिशा करत रिक्षा चोरी करणाऱ्या संशयितास ताब्यात घेतले असून त्याच्या तब्बल सहा रिक्षा ताब्यात घेतल्या आहेत. 

नाशिक शहर पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट एकच्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. नाशिकच्या भारत नगर परिसरात चोरीची रिक्षा घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रामनाथ गोळेसर (वय ४०) या संशयित आरोपीला रिक्षासह ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आणखी पाच रिक्षा चोरी केल्याची माहिती दिली.  

मुंबई- ठाण्यातून रिक्षा चोरी 

नाशिकमध्ये नंबरप्लेट बदलवून वापरण्यात येत असलेल्या रिक्षा या मुंबई आणि ठाण्यातून चोरी केल्याचे पोलिसात समोर आले आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून या चोरीच्या रिक्षा नाशिकमध्ये नंबर प्लेट बदलून वापरणारा आणि विक्री करणाऱ्या संशयितास सहा रिक्षांसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आणखी तपास सुरु असून यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे.  

सव्वासहा लाखाच्या रिक्षा जप्त 

दरम्यान या संशयिताच्या ताब्यातून सहा लाख २५ हजार रुपयांचा असा एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या रिक्षा चोरी करणाऱ्या इसमाला ताब्यात घेतल्यानंतर त्याला मुंब्रा पोलीस ठाणे, शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि कळवा पोलीस ठाणे या ठिकाणी हस्तगत केलेल्या मुद्देमालासह पुढील तपासासाठी हजर करण्यात आले आहे. यानंतर स्थानिक पोलिसांकडून पुढील चौकशी सुरु करण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

SCROLL FOR NEXT