Grapes Farming : बदलत्या हवामानामुळे द्राक्ष शेती संकटात; बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

Sangli News : सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने द्राक्ष शेती गेल्या काही दिवसापासून बदलते हवामानमुळे द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे काही दिवस धुके पडल्याने द्राक्षचे घड कुजू लागले आहेत
Grapes Farming
Grapes FarmingSaam tv
Published On

सांगली : राज्यात मागील आठवड्यात थंडी वाढली होती. यानंतर गेल्या काही दिवसापासून सांगली जिल्ह्यामध्ये बदलत्या हवामानामुळे द्राक्ष शेती संकटात आली आहे. हवामान बदलामुळे हाता तोंडाला आलेली द्राक्षबाग वाया जात आहे. द्राक्षचे घड कुजणे, रोगाचा प्रादुर्भाव या संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी बागा वाचवण्यासाठी फवारण्या करू लागला आहे.

नाशिक जिल्ह्याप्रमाणे सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने द्राक्ष शेती केली जाते. मात्र गेल्या काही दिवसापासून बदलते हवामान यामुळे या द्राक्ष बागांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. गेल्या काही दिवस धुके पडल्याने द्राक्षचे घड हे कुजू लागले आहेत. तर त्याच्यावर रोगाचा प्रादुर्भाव देखील होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकरी आपली बाग वाचवण्यासाठी द्राक्ष पिकावर औषधी वापरून फवारणी करत आहे. जिल्ह्यात हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.

Grapes Farming
Grapes Farming : काळ्या द्राक्षाच्या पेटीला ५५१ रुपये विक्रमी दर; लहरी हवामानातही कष्टाने वाचवली बाग

शेतकऱ्यांच्या समोर अनेक संकटे उभे टाकले आहेत. द्राक्ष पिक तयार झाल्यावर वटवाघुळणे काही दिवसापूर्वी शेतकऱ्याची बाग फस्त केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्याला फटका बसू लागला आहे. आधीच पाण्याचे नियोजन आणि बदलते हवामान औषधाचा खर्च आणि बँकेतून कर्ज काढून बाग उभ्या केल्या आहेत. या सर्व संकटातून शेतकरी कसाबसा बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे.

Grapes Farming
Sambhajinagar CIDCO Police : गुटख्याच्या गोडाऊनवर छापा; संभाजीनगर सिडको पोलिसांची कारवाई, १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

द्राक्ष शेती होतेय कमी 

सततच्या संकटामुळे जिल्ह्यातील द्राक्ष शेती कमी होत चाललेले आहे. याआधी द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात होती. मात्र हे बदलते हवामान औषधाचा खर्च आणि आसमानी संकटामुळे द्राक्ष शेती नष्ट होऊ लागले आहे. अर्थात द्राक्ष बागांसाठी लागणारा खर्च, यातच येणाऱ्या नैसर्गिक संकटामुळे फारसे चांगले उत्पन्न येत नाही. शिवाय भाव देखील मिळत नसल्याने खर्च निघत नसल्याने शेतकरी द्राक्ष उत्पादन घेण्यास मागे हटू लागला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com