Grapes Farming : काळ्या द्राक्षाच्या पेटीला ५५१ रुपये विक्रमी दर; लहरी हवामानातही कष्टाने वाचवली बाग

Sangli News : यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला यावर्षी झालेला पाऊस तसेच धुके यामध्ये अनेक फुलोरा अवस्थेत असणाऱ्या द्राक्षबागा अडचणीत आल्या केलेल्या खर्चाचे लाखो रुपये वाया गेले
Grapes Farming
Grapes FarmingSaam tv
Published On

सांगली : यंदा झालेल्या अतिवृष्टीशेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशात देखील सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील नागठाणे येथील निवृत्त सैनिक असलेल्या द्राक्ष बागायतदार धनाजी जयसिंग पाटील यांनी मात करत द्राक्षाचे उत्पादन घेतले आहे. त्यांनी पिकविलेल्या कृष्णा या काळ्या द्राक्षाला ५५१ रुपये असा चार किलोस असा विक्रमी दर मिळाल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी झालेला पाऊस तसेच पडणारे धुके यामध्ये अनेक फुलोरा अवस्थेत असणाऱ्या द्राक्षबागा अडचणीत आल्या. शेतकऱ्यांनी केलेल्या खर्चाचे लाखो रुपये वाया गेले. यातून काही बागा शेतकऱ्यांनी वाचवल्या आहेत. या पैकीच धनाजी पाटील हे एक शेतकरी आहेत. यांची पावने दोन एकर द्राक्ष बाग दरवर्षी ते मोठ्या जिद्दीने ती पिकवतात. यंदा द्राक्ष बाग बदलत्या वातवरणात मोठ्या कष्टाने त्यांनी वाचवली आहे.

Grapes Farming
Raigad News: समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेले असता घडलं भयंकर, ७ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

किलोला सरासरी १३७ भाव 
सांगली जिल्ह्याती अनेक द्राक्ष बागांवर वटवाघळांनी हल्ला करत नुकसान केले आहे. यामुळे द्राक्षे वटवाघळांच्या तावडीतून वाचविण्यासाठी बागेवर जाळी अंथरली. तर बदलत्या वातावरणाचा सामना करत अखेर त्यांना ५५१ रुपये ४ किलो असा सौदा फिक्स झाला आहे. सरासरी किलोला १३७ रुपये भाव त्यांना मिळणार आहे. पावने दोन एकरात १३ टन द्राक्ष उत्पादन त्यांना मिळेले असे पाटील यांनी सांगितले.

Grapes Farming
Chicken Shawarma: पोटदुखी अन् उलट्या, चिकन शोरमा खाल्ल्याने ५ मुलांना विषबाधा; उरणमध्ये खळबळ

घाईगडबडीत व्यवहार नको 
अनेक आपत्तीमुळे यावर्षी द्राक्ष पीक कमी आहे. बागायतदारांनी अजिबात घाईगडबडीत व्यवहार करू नयेत. व्यापारी आणि दलाल दर पाडून मागतात. पावसाची भीती घालतात. त्याला अजिबात फसू नये, द्राक्ष बागायतदारांनी एकमेकांच्या संपर्कात राहावे, म्हणजे फसवणूक टळेल. नवीन व्यापाऱ्यांबरोबर व्यवहार करताना दक्षता घ्यावी; असे आवाहन धनाजी पाटील यांनी द्राक्ष उत्पादकाना केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com