Raigad News: समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेले असता घडलं भयंकर, ७ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

7 Years Old Girl Physically Assaulted In Murud: रायगडच्या मुरूडजवळ समुद्रकिनाऱ्यावर ७ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
Raigad News: समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेले असता घडलं भयंकर, ७ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
7 Years Old Girl Physically Assaulted In MurudSaam Tv
Published On

सचिन कदम, रायगड

रायगडच्या मुरूडमध्ये ७ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भावासोबत समुद्रकिनारी फिरायला गेले असता ही घटना घडली. मुरूडच्‍या कोर्लई गावातील धक्‍कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे रायगडमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रेवदंडा पोलिस ठाण्‍यात आरोपीविरोधात पोक्‍सो अंतर्गत गुन्‍हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुरूड तालुक्‍यातील कोर्लई इथं अल्‍पवयीन मुलीवर लैंगिक अत्‍याचार झाल्‍याचा धक्‍कादायक प्रकार समोर आलाय. ७ वर्षांची मुलगी आपल्‍या भावासोबत समुद्र किनारी फिरायला गेली होती. आरोपी या मुलाला समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या बोटीवर घेऊन गेला आणि त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

Raigad News: समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेले असता घडलं भयंकर, ७ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
Raigad Politics : रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच; भरत गोगावलेंचे लागले बॅनर, तटकरे गटाचाही दावा

पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या भावाला सांगितला तेव्हा ही घटना उघड झाली. या घटनेप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्‍यात आरोपी पोक्‍सो कायद्याखाली गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. सध्या पीडित मुलीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

Raigad News: समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेले असता घडलं भयंकर, ७ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
Raigad Crime : अनैतिक संबंधातून निवृत्त बँक कर्मचाऱ्याची हत्या, महिलेने जेवणात विष कालवून संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com