Raigad News : रेवदंडा पुलावरील वाहतूक 8 ते 10 जून राहणार बंद : जिल्हाधिकारी याेगेश म्हसे

याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेव यांनी सादर केला होता.
revdanda bridge
revdanda bridgesaam tv

- सचिन कदम

Revdanda Bridge News : अलिबाग आणि मुरुड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या कुंडलिका खाडीवरील रेवदंडा पुलावरील वाहतूक येत्या आठ जून ते दहा जून असे तीन दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे. त्याबाबतचे आदेश प्रशासनाने काढले आहेत. दरम्यान पूर्ण बंद कालावधीसाठी पर्यायी जलवाहतूक सुरू करावी अशी प्रवाशांची मागणी आहे.  (Maharashtra News)

revdanda bridge
Nagar News : भाविकांनाे ! नगर शहरातील 16 मंदिरात 'ड्रेस कोड' लागू

रेवदंडा-साळाव पुलावरून होणाऱ्या अति अवजड वाहतुकीमुळे पूल नादुरुस्त झाल्यास होणारी दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने तसेच पुलाची पुनर्बांधणी व पुलाचे लोड टेस्टिंगचे काम करण्याकरीता येत्या 8 ते 10 जून असे तीन दिवसांसाठी सर्व वाहनांसाठी वाहतुक बंद ठेवली जाणार आहे. त्याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी जारी केली आहे. याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेव यांनी सादर केला होता.

revdanda bridge
Shiv Sena आक्रमक, Last Warning देत शिवसैनिकांनी संजय राऊतांना हात पाय ताेडण्याची दिली धमकी

या अधिसुचनेच्या दिनांकापासून रेवदंडा-साळाव पुलावरील 5 टनावरील अवजड वाहतुक 20 दिवसांकरीता बंद करण्यात आली आहे. आता तर 8 ते 10 जून या तीन दिवसांकरीता पुलाच्या लोड टेस्टींगच्या कामाकरीता हा पुल सर्व प्रकारच्या वाहतुकीकरीता बंद असणार आहे.

या मार्गावरील सर्व वाहतूक अलिबाग ते साळाव दरम्यान होणारी अवजड वाहनाची वाहतुक ही अलिबाग-पोयनाड- वडखळ-नागोठणे-कोलाड-रोहा-तळेखार-साळावमार्गे अथवा अलिबाग-पेझारी-चेकपोस्ट-नागोठणे-कोलाड-रोहा-तळेखार-साळाव मार्गे

दुसरा पर्यायी मार्ग अलिबाग-बेलकडे-पोयनाड-अलिबाग अथवा मुरूड-साळाव-तळेखार-रोहा-कोलाड- नागोठणे-पेझारी-चेकपोस्ट-अलिबाग तसेच दुसरा मार्ग मुरूड-साळाव-तळेखार-रोहा-सुडकोळी-वावे-बेलकडे-अलिबाग-या पर्यायी मार्गाचा वापरी करू शकतात असे कळविले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com