Nashik Crime Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime : नाशिकमध्ये मध्यरात्री तुफान राडा; वर्चस्व वादातून गोळीबार, पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल

Nashik News : एकमेकांच्या दिशेने बाटल्या, दगड आणि काठ्या भिरकवण्यात आल्या. यात विनोद वाघ याने रोहित्या टोळीच्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले

Rajesh Sonwane

तबरेज शेख 

नाशिक : नाशिकच्या पंचवटी परिसरात वाघ आणि रोहित्या टोळी मध्यरात्रीच्या सुमारास समोरासमोर आले होते. दोन्ही गटात वर्चस्व वादातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पंचवटी परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसात दोन्ही टोळीतील बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

नाशिकच्या पंचवटी येथील फुलेनगर परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास दोन टोळ्यांमध्ये असलेला वाद उफाळून आला. वर्चस्व वादातून हा वाद असून मध्यरात्रीच्या सुमारास तुफान राडा झाला. त्यात एकमेकांच्या दिशेने बाटल्या, दगड आणि काठ्या भिरकवण्यात आल्या. यात विनोद वाघ याने रोहित्या टोळीच्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

वर्चस्व वादातून कुरापत 

जुन्या वादातून दोन गटात गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. तर वर्चस्ववादातून कुरापत काढून गोळीबार झाल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. घटना घडल्यानंतर पंचवटी पोलिसांनी लागलीच धाव घेत टोळक्याला पांगविले. तसेच यात दहा ते बारा जणांवर पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. मात्र नाशिकच्या टोळी युद्धामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.  

टोळीतील सर्व सराईत गुन्हेगार 

या प्रकरणात सर्व सराईत गुन्हेगार असून प्रत्येकावर पाच ते सहा गंभीर गुन्हे दाखल आहे. गुन्ह्यातील दोघे हद्दपार असूनही शहरात वावरत वावरत गुन्हा केला असून पोलिस सर्वाचा शोध घेत आहे. मात्र पंचवटीतील टोळी युद्धामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंचवटी पोलीसांनी दोन पथके फरार असलेल्याच्या मागावर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'रमी खेळा अन् जिंकलेले पैसे मला पाठवा', तरूण शेतकऱ्याने कृषीमंत्र्यांना पाठवले ५५५० रुपये

Maharashtra Live News Update: आज संपूर्ण विदर्भात पावसाचा अलर्ट

Surya Gochar: 10 वर्षांनी सूर्य करणार बुध ग्रहाच्या नक्षत्रामध्ये बदल; 'या' 3 राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु

Mobile Tips: तुमचा जुना फोन होईल अगदी नवीन, फॉलो करा 'हे' सोपे टिप्स

Nagpur News : बस अडवून खिडकीवर चढला, प्रवाशांना मारहाण; अर्धनग्न होत तरुणाचा भररस्त्यात राडा, शेवटी....

SCROLL FOR NEXT