Nashik Crime  Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Crime: नाशिक हादरले! घरात घुसून १८ वर्षीय तरुणाची हत्या; शेजारी झोपलेल्या भावालाही कळालंही नाही

18 Year Old Boy Killed In Nashik: घरामध्ये झोपलेल्या तरुणाची घरात घुसून धारदार शास्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना नाशिकच्या गंजमाळमधील पंचशीलनगरमध्ये घडली.

Priya More

तरबेज शेख, नाशिक

नाशिकमध्ये (Nashik) धक्कादायक घटना घडली आहे. घरामध्ये झोपलेल्या १८ वर्षांच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नाशिकच्या गंजमाळ परिसरात ही घटना घडली आहे. भरवस्तीत घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हत्येनंतर आरोपी फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरामध्ये झोपलेल्या तरुणाची घरात घुसून धारदार शास्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना नाशिकच्या गंजमाळमधील पंचशीलनगरमध्ये घडली. पांडू शिंगाडे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पांडू आपल्या मोठ्या भावासोबत घरामध्ये झोपला होता. त्याचवेळी मध्यरात्री अडीचच्या सुमारास त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच पांडूचा जागीच मृत्यू झाला.

पांडूवर हल्ला करून हल्लेखोर फरार झाला. पांडूची हत्या कोणी आणि कशासाठी केली याचे कारण समोर आले नाही. भद्रकाली पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीत घरात झोपलेल्या तरुणांची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत भद्रकाली पोलिस अधिक तपास करत आहे.

घराजवळ राहणाऱ्या नातेवाईकाचा दहावा करून घरी येऊन पांडू झोपला होता. झोपेत असतानाच त्याच्यावर हल्ला करण्यात आला. महत्वाचे म्हणजे पांडूचा मोठा भाऊ त्याच्या शेजारीच झोपला होता. तरी देखील त्याला कळाले नाही. पांडूचा भाऊ दारू पिऊन झोपला होता. सकाळी पांडूची चुलत बहीण घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेचा तपास भद्रकाली पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनो, हे काम आताच करा, अन्यथा मिळणार नाही ₹२००० ; पीएम किसान योजनेबाबत अपडेट

After OLC: मराठी चित्रपटाला साऊथच्या अ‍ॅक्शनचा तडका; 'आफ्टर ओ.एल.सी'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्याचे मामेभाऊ अल्हाद कलोती नगरसेवक पदासाठी रिंगणात...

सर्वात मोठी बातमी! जहाल नक्षलवादी हिडमा चकमकीत ठार, ६ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले

IMD Recruitment: सरकारी नोकरीची संधी, हवामान विभागात भरती; पगार मिळणार १,२३,००० रुपये; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT