Kalyan Crime : इथं टेम्पो का उभा केला, म्हणत तरुणाला दिला चोप; भाजपच्या माजी नगरसेवकावर मारहाणीचा आरोप

Kalyan News: कल्याणमध्ये रस्त्यावर टेम्पो उभा करण्यावरून झालेल्या वादातून भाजपच्या माजी नगरसेवकाने एका तरुणाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
इथं टेम्पो का उभा केला, म्हणत तरुणाला दिला चोप; भाजपच्या माजी नगरसेवकावर मारहाणीचा आरोप
Kalyan Manpada Police StationSaam Tv

अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण प्रतिनिधी

रस्त्यावर टेम्पो उभा करण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना कल्याण पूर्व पिसवली परिसरात घडली आहे. मुमताज खान, असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने आरोप केला आहे की, भाजपचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर आणि त्यांच्या साथीदारांनी त्याला मारहाण केली. तर मोरेश्वर भोईर यांनी तरुणाचे सर्व आरोप फेटाळले असून माझ्या प्रकरणाशी काही संबंध नसून पोलीस तपास करत आहेत, खरं काय ते समोर येईल, असे सांगितलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील पिसवली चेतना परिसरात रस्त्यावर टेम्पो उभा करण्यावरुन मुमताज खान या तरुणाचा काही तरुणांसोबत वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. मुमताज खान याला बेदम मारहाण करण्यात आली.

इथं टेम्पो का उभा केला, म्हणत तरुणाला दिला चोप; भाजपच्या माजी नगरसेवकावर मारहाणीचा आरोप
Team India Parade Bus : काही दिवसांनी आम्हालाही तिकडेच जावे लागेल; गुजरात पासिंग बसवरून जितेंद्र आव्हाड यांचा टोला

गंभीर जखमी अवस्थेत त्याला डाेंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुमताज याच्या हाताला डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. घडलेल्या घटनेबद्दल सांगताना मुमताज खान म्हणाला की, जेवण झाल्यानंतर मी घराबाहेर पडलो. काही जणांनी मला टेम्पो बाजूला घ्यायला सांगितले. त्यानंतर माझ्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर स्थानिक माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी त्यांच्या साथीदारांसह मला मारहाण केली.

इथं टेम्पो का उभा केला, म्हणत तरुणाला दिला चोप; भाजपच्या माजी नगरसेवकावर मारहाणीचा आरोप
Team India News: वर्ल्डकप विजेत्यांचा होणार गौरव! रोहितसह महाराष्ट्रातील या 3 खेळाडूंना एकनाथ शिंदेंकडून भेटीचं आमंत्रण

मात्र माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. टेम्पो उभा करण्यावर संबंधित तरुणाचा वाद झाला होता. पण मी त्याला मारहाण केली नाही. माझा या घटनेशी काडीमात्र संबंध नाही. पोलीस तपास करतील. तपासात जे निष्पन्न होईल ते समोर येईल, असे सांगून त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे. या बाबत मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने यांनी सदर तरुणावर उपचार सुरु आहे, त्याचा जबाब घेण्यात आला आहे. पुढील तपास सुरु असून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगीतले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com