LADKI BAHIN YOJANA MONEY USED AS BAIT: NASHIK MAN ARRESTED FOR ASSAULTING WOMAN Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : धक्कादायक! 'लाडकी बहीण' योजनेच्या पैशातून दागिन्यांचे आमिष; महिलेला पळवून नेऊन बलात्कार

Nashik Crime News : लाडकी बहीण योजनेच्या पैशातून दागिने करून देण्याचे आमिष दाखवून नाशिकमधील एका महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • लाडकी बहीण योजनेच्या पैशातून दागिने करून देण्याचे आमिष दाखले

  • आरोपीने महिलेला गावाबाहेर नेऊन धमकावत अत्याचार केले

  • पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • आरोपी अटकेत

राज्यातील लाखो महिलांच्या खात्यात दर महिन्याला लाडकी बहीण योजनेचा १५०० रुपयांचा हप्ता जमा होतो. या पैशातून महिला स्वतःचा खर्च भागवतात. कपडे, भांडी, दागिने सारख्या अनेक गोष्टी स्वतःसाठी खरेदी करतात. मात्र याचाच फायदा घेत नाशिकच्या तरुणाने एका महिलेसोबत संतापजनक कृत्य केलं आहे. या तरुणाने महिलेला लाडक्या बहिणीच्या पैशातून दागिने खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना नाशिकच्या अमळनेरमध्ये घडली आहे. सुदाम भगवान भिल असे आरोपीचे नाव आहे. तर पीडित महिलेचे नाव संगीता (बदलेल नाव) असे आहे. संगीताचा पहिल्या नवऱ्यासोबत घटस्फोट झाल्याने ती आई वडिलांकडे माहेरी राहत होती. मार्चमध्ये महिलेच्या खात्यात तब्बल ७० हजार रुपये जमा झाले होते. या पैशांचं सोन करून घेऊ असे महिलेला तिची आत्या आणि आत्ये बहीणीने सांगितलं. मार्चमध्ये पीडित महिला उषाबाई, दुर्गाबाई व स्वतःच्या लहान मुलाला घेऊन अमळनेरला निघाले.

त्यानंतर मंगळग्रह मंदिराजवळ उतरल्यावर दुर्गाबाईचा मुलगा सुदाम आला. दुर्गाबाई आणि उषाबाई यांनी सुदामसोबत महिलेला तिच्या लहान मुलासह गाडीत बसवून पाठवून दिले. मात्र,सुदामने गाडी सोनाराच्या दुकानाकडे न वळवता दुसऱ्याच रस्त्याला नेली. सुदामने महिलेला बहाळ येथे घेऊन गेला व गावाबाहेर झोपडी बांधून महिलेसोबत राहू लागला. "तू कोणाला सांगितलं, तर तुझ्या मुलाला संपवेन" अशी धमकी दिली आणि तिच्यावर बळजबरीने अत्याचार करत होता.

काही दिवसानंतर आरोपी पीडित महिलेला आणि तिच्या मुलाला घेऊन शिरपूर तांडा येथे घेऊन गेला. साधारणतः दोन महिने एका रूममध्ये राहिल्यानंतर १६ जून रोजी आरोपी बाहेर गेल्याची संधी साधत पीडित महिलेने बहिणीचं घर गाठलं. तिने घडलेला सगळा प्रकार बहिणीला सांगितला. त्यानंतर महिलेच्या कुटूंबियांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संशयित सुदाम भिल याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून, सुदाम याला अटक केली आहे. सहायक निरीक्षक साजिद मन्सुरी तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : जेजुरी अपघातातील मृतांचा आकडा वाढला

Pune Accident : वारीत पुन्हा भयंकर अपघात, भरधाव कारने वारकऱ्याला चिरडले, जागेवरच मृत्यू

'मंत्रिपद सोडायचं नसेल तर...', सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला मराठमोळ्या कलाकारांचा पाठिंबा; केंद्र सरकारला दिला 'हा' सल्ला

Healthy morning habits: चांगल्या आरोग्यासाठी सकाळच्या या ६ सवयी वेळीच बदला!

पावसाळ्यात रोज आवळा ज्यूस प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT