मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

Former Punjab CM Cousin Joins BJP : माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचे चुलत भाऊ आणि माजी मेजर भूपिंदर सिंग ढिल्लन यांनी शिरोमणी अकाली दल सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
Former Punjab CM  Cousin Joins BJP
Bhupinder Singh Dhillon joins BJP after leaving Shiromani Akali Dalsaam tv
Published On
Summary
  • भूपिंदर सिंग ढिल्लन यांनी अकाली दलाला केला रामराम

  • भूपिंदर सिंग ढिल्लन यांनी चंदीगडमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.

  • हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा झाला.

पंजाबमधील युतीबाबत चर्चा सुरू असतानाच, भाजपने शिरोमणी अकाली दलाला मोठा धक्का दिला आहे. माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचे चुलत भाऊ आणि माजी मेजर भूपिंदर सिंग ढिल्लन यांनी अकाली दल सोडून भाजपमध्ये प्रवेश केलाय. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांच्या उपस्थितीत त्यांनी कमळ हाती घेतलंय. चंदीगडमधील सेक्टर ३७ येथील पंजाब भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

Former Punjab CM  Cousin Joins BJP
मोठी बातमी! आता बंडखोर खासदारांच्या गटातच फूट? 17 जणांनी निवडला वेगळा मार्ग

याप्रसंगी भूपिंदर सिंग यांचे पुत्र अमरवीर सिंग बावा हे देखील भाजपमध्ये सामील झाले. पंजाब भाजपचे अध्यक्ष केवल सिंग ढिल्लन हे देखील यावेळी उपस्थित होते. भूपिंदर सिंग यांनी यापूर्वी प्रकाश सिंग बादल यांचे राजकीय सचिव म्हणून काम केले आहे.

Former Punjab CM  Cousin Joins BJP
पक्ष बदलणाऱ्या खासदार- आमदारांना चाप बसणार; पक्षांतर रोखण्यासाठी कपिल सिब्बलांनी सुचवला 'मास्टरप्लॅन'

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी काय म्हणाले?

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी सांगितले की, पक्षात सामील होणाऱ्या प्रत्येकाला योग्य सन्मान दिला जाईल. यापूर्वी येथे काँग्रेसचे सरकार होते. काँग्रेस सरकार आपली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले आणि भ्रष्टाचारात बुडाले होते. जनता या गोष्टीला कंटाळली होती. त्यांनी पंजाबमध्ये रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात ते भ्रष्टाचाराच्या दलदलीत रुतले. जनतेने त्यांना सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवला.

'आप'चे लोक केवळ विनोद करण्यातच मग्न

सैनी पुढे म्हणाले की, केजरीवाल यांनी मंचावरून आपल्या लोकांना 'कट्टर प्रामाणिक' असल्याचे जाहीर केले होते. लोकांनी त्यांच्याकडून पंजाबसाठी काम करण्याची अपेक्षा केली होती, पण ते तर काँग्रेसच्याही दोन पावले पुढे गेलेत. सकाळी उठल्यापासून ते दिवसभर केवळ विनोद करत असतात. विनोदांनी पोट भरत नाही. आता पाच वर्षे उलटून गेली आहेत. त्यांनी ५७ घोषणा केल्या होत्या; त्यापैकी प्रत्यक्षात किती पूर्ण झाल्या, असा प्रश्न लोक विचारू लागलेत.

काँग्रेस आणि 'आप'चे साटेलोटे

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यात साटेलोटे आहे. ते 'इंडिया' (INDIA) आघाडीचे सदस्य आहेत. हे दोन्ही पक्ष पडद्यामागून एकमेकांशी संगनमत करून वागत आहेत; जाहीरपणे एकमेकांवर टीका-टिप्पणी करत असले, तरी संध्याकाळी मात्र ते एकत्र बसून जेवण करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com