गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

Traffic Police Begin Action Against MLA Stickers On Car: गाडीवर आमदाराचे नाव, नेत्याचा फोटो किंवा अशोकस्तंभाचा लोगो लावून राजकीय प्रभाव दाखवणाऱ्यांवर आता वाहतूक पोलिसांची नजर आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये अशा वाहनांवर कारवाईला सुरुवात झाली आहे.
Pimpri Chinchwad traffic police crackdown on political vehicle stickers
Pimpri Chinchwad traffic police crackdown on political vehicle stickers
Published On
Summary
  • गाडीवर आमदाराचा फोटो आणि नावाचा स्टिकर लावणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

  • पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय स्टिकर असलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

  • गाडीवर अशोकस्तंभ आणि आमदारकीचा लोगो लावणे नियमबाह्य आहे का

गाडीवर आमदाराचा फोटो लावून गाडी इकडून तिकडे फिरवणाऱ्याची आता खैर नाही. गाडीवरून राजकीय पॉवर दाखवणाऱ्याचा माज पोलीस उतरवणार आहे. नेत्याचा फोटो, अशोकस्तंभ असलेला लोगो वाहनावर लावून आपली राजकीय ओळख दाखवायची आणि त्याच्या जोरावर पोलिसांकडून व्हीआयपी सवलत मिळवायची, असा प्रकार वाढू लागलाय. महाराष्ट्रातील अनेक भागांत अशा प्रकारचे चित्र दिसत आहे.

आता अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये कारवाईची सुरवात झालीय. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांत पोलिसांनी वाहनांची तपासणी करताना थार, बीएमडब्ल्यू, डिफेंडर, फॉर्च्युनर यांसारख्या महागड्या वाहनांवर अशोकस्तंभ आणि आमदारकी दर्शविणारे लोगो लावल्याचे आढळले. काही वाहनांवर हा लोगो मागील बाजूस, तर काही वाहनांच्या पुढील काचेवर लावण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

Pimpri Chinchwad traffic police crackdown on political vehicle stickers
Agricultural Loan: १ बिघा शेतजमीन असेल तर किती कर्ज मिळू शकते?

आमदाराचा लोगो नेमका कशासाठी?

वाहनांवर अशा प्रकारचे लोगो का लावले, याबाबत संबंधित चालकांकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी केवळ आर्थिक फायदा व्हावा, वाहनाला विशेष वागणूक मिळावी, या उद्देशाने लोगो लावले जात असल्याची बाब समोर आलीय. , पोलिसांनी अधिकृत परवानगी किंवा संबंधित कागदपत्रांबाबत विचारणा केली असता लोगो वाहनावर लावण्यासाठी कोणतेही अधिकृत कागदपत्र नसल्याचे समोर आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर अशा वाहनांवर मोटार वाहन कायदा कलमानुसार कारवाई करण्यात येतेय.

Pimpri Chinchwad traffic police crackdown on political vehicle stickers
उद्धव ठाकरे पुढच्या वर्षी मुख्यमंत्री होणार! बड्या नेत्याच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

रस्त्यावर नियम सर्वांसाठी समान असताना, वाहनावर आमदाराचा लोगो लावून ‘आपल्याला कोणी अडवणार नाही’, असा समज निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. आमदार हा जनतेचा लोकप्रतिनिधी असतो; त्यांच्या नावाचा किंवा पदाचा वापर करून वैयक्तिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न होतोय, त्यामुळे अशा चालकांवर कारवाई झाली पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com