महाराष्ट्र

Nashik Corona News: नाशिककरांनो काळजी घ्या! नाशिकमध्ये कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ, प्रशासन अलर्ट

साम टिव्ही ब्युरो

Nashik Corona Update : देशासह राज्यात कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. नाशिकमध्येही आज कोरोना बाधित रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

नाशिकमध्ये आज दिवसभरात 29 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. नाशिक शहरात 13 तर ग्रामीण भागात 16 रुग्णांची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची लवकरच टास्क फोर्ससोबत बैठक

मंत्री गिरीष महाजनांनी म्हटलं की, लोकांनी कोविडबाबत घाबरण्याचं कारण नाही. पुढील चार महिने सणांचे आहेत, मात्र काळजी घेणं गरजेचं आहे. मागच्या काळात आपण किती त्रास सहन केलात हे सर्वांना माहित आहे. सोमवार किंवा मंगळवारी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आम्ही टास्क फोर्सची बैठकही बोलवणार आहे.

मुंबईत मास्कसक्तीची शक्यता

मुंबईत येत्या दोन महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या शक्यतेमुळे मुंबई महापालिका गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्तीचा या तयारीत आहे.

अमरावतीत एकाचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यातही आज दिवसभरात 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे 33 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crop Loan : वर्धा जिल्ह्यात पीक कर्जासाठी बँकांना ११०० कोटींचे उद्दिष्ट; १० टक्के कर्ज वितरित

Soni Razdan News : आलिया भट्टच्या आईसोबत झाला मोठा स्कॅम, पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिला महत्वाचा सल्ला

Rohit Pawar News: 'मतदानाचा परळी पॅटर्न', बीडमध्ये बुथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न, रोहित पवारांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप; VIDEO

Constable Vishal Patil Death Case: विशाल पवार मृत्यू प्रकरणात, शवविच्छेदनातून चक्रावून टाकणारी माहिती उघड

Benifits of Fruit Peel: फळांच्या सालीचे त्वचेसाठी जबरदस्त फायदे; जाणून घ्या

SCROLL FOR NEXT