Mumbai Mask Compulsion News: मुंबईत गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती होणार? BMC कठोर निर्णयाच्या तयारीत

Mumbai Covid Precautions: मुंबईत येत्या दोन महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Mumbai News
Mumbai NewsSaam tv
Published On

रुपाली बडवे

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठं वृत्त हाती आलं आहे. मुंबईत येत्या दोन महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या शक्यतेमुळे मुंबई महापालिका गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती कठोर निर्णयाच्या तयारीत आहे. (Latest Marathi News)

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यात मुंबईत सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. यामुळे मुंबईकरांना गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती करण्याचा विचार महापालिकेचा (BMC) आरोग्य विभाग करत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Mumbai News
Family Found Dead In Delhi: मच्छर अगरबत्ती लावून झोपी गेलं अख्खं कुटुंब, सकाळी ६ जण मृतावस्थेत आढळले; दिल्लीतील घटनेने हळहळ

मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्टेशन, बेस्ट बस, मॉल आणि अन्य गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती करण्याचा पालिकेचा विचार करत आहे. मात्र, राज्य सरकारने याबाबत परवानगी दिल्यानंतरच पालिका याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढणार

मुंबईत एप्रिल आणि मेअखेरपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या वाढणार असल्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. या पर्श्वभूमीवर 1 एप्रिलपासून सर्व 24 वॉर्डमध्ये 'वॉर्ड वॉर रूम' पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

रुग्णांची संख्या वाढण्याचा इशारा देण्यासोबत प्रशासनाकडून त्या पार्श्वभूमीवर तयारी देखील करण्यात येत आहे. केईएम, शीव, नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांसह महत्त्वाच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये 4 हजार बेड ऑक्टिव्ह करण्यात येणार आहे. तसेच खासगी रुग्णालयांमध्ये 10 टक्के बेडचे 'कोविड वॉर्ड' तैनात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Mumbai News
Jitendra Awhad News: छत्रपतींच्या वारसांना अशी वागणूक तर बाकीच्यांच काय? संयोगिता राजेंच्या 'त्या' व्हायरल पोस्टनंतर जितेंद्र आव्हाड संतापले

राज्यात कोरोना रुग्णांची वाढ

राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ६९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे . राज्यात आता कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ३,०१६ इतकी झाली आहे.

दुसरीकडे, राज्यात कोरोना, एच१ एन१, एच३ एन२ आणि इन्फ्लूएन्झा रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, दोन व्यक्तींमध्ये योग्य अंतर ठेवा, हात सॅनिटायझरने स्वच्छ ठेवा, गर्दीची ठिकाणे टाळा असे आरोग्यमंत्र्यांकडून आवाहन करण्यात आले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने राज्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com