workers strike interrupts nashik city link bus service since two days  saam tv
महाराष्ट्र

Nashik City Bus Service : सिटी लिंक बस सेवा आजही ठप्प, नाशिककरांचे हाल

Nashik City Link Bus Employees Strike : मागील तीन महिन्यांचा पगार न मिळाल्याने गुरुवारपासून सिटी लिंक बस सेवेच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik :

नाशिक शहरातील सिटी लिंक बस सेवा आज (शुक्रवार) सलग दुस-या दिवशी विस्कळीत झाली आहे. सिटी लिंकच्या तपोवन बस डेपोतील (tapovan bus depot) वाहक कर्मचाऱ्यांनी कामावर येण्यास नकार दिल्याने आजही बस सेवा ठप्प झाल्याचे चित्र आहे. (Maharashtra News)

मागील तीन महिन्यांचा पगार न मिळाल्याने गुरुवारपासून सिटी लिंक बसच्या (Nashik City Link Bus Service) कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. तपोवन डेपोतील कर्मचाऱ्यांनी आजही काम बंद आंदाेलन ठेवले आहे. यामुळे शहर बस वाहतुकीच्या बस फेऱ्यांवर परिणाम झाला आहे.

सधया तपोवनमध्ये असलेल्या बस डेपोतून एकही बस बाहेर पडलेली नाही. सलग दुस-या दिवशी बसची सेवा बंद राहिल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होताना दिसत आहे. अनेकांना खासगी वाहनांचा आधार घेत इच्छित स्थळी जावे लागत आहे. परिणामी नाशिककरांना आर्थिक भुर्दंड साेसावा लागत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT