mahashivratri 2024 trimbakeshwar mandir will remain opened for 24 hrs Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: नाशिकच्या त्र्यंबकेश्वराचं VIP दर्शन बंद! वाढत्या गर्दीमुळे मोठा निर्णय; पहाटे ५ वाजताच उघडणार मंदिर

Nashik trimbakeshwar Temple VIP Darshan News: त्र्यंबकेश्वर मंदिरात १ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाने भाविकांना दर्शन करणे सोपे होणार आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक, ता.३ ऑगस्ट २०२४

श्रावण महिन्यात नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात होणारी मोठी गर्दी पाहता मंदिर समितीने सर्वात महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात १ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाने भाविकांना दर्शन करणे सोपे होणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिर हे बारा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आद्य ज्योतिर्लिंग आहे. देश- विदेशातून लाखो- भाविक याठिकाणी दर्शनासाठी येत असतात. अशातच आता श्रावण मास सुरू होणार असल्याने मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. या भाविकांना व्हीआयपी दर्शनामुळे फटका बसत असल्याचे निदर्शनास आले. ज्यामुळे मंदिर समितीने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

मंदिर समितीने १ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांसाना दर्शनासाठी खुले राहणार आहे.

राजशिष्टाचाराशी संबंधित व्यक्ती वगळता अन्य सर्व प्रकारची व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करण्यात आली आहेत. तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा घालून त्यांची दर्शनाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. स्थानिक ग्रामस्थांना पहाटे मंदिर उघडल्यापासून सकाळी १०.३० वाजेपर्यंत आणि सायंकाळी ६ ते ८ वेळ निश्चित करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT