Pune Konkan Highway : पुण्यातून कोकणात जाणारा राष्ट्रीय महामार्ग खचला; वाहतूक ५ ऑगस्टपर्यंत बंद

Pune News : पुण्यातील चांदणी चौकातून कोकणात जाणारा राष्ट्रीय महामार्ग अतिवृष्टीमुळे आदरवाडी आणि डोंगरवाडी (ता. मुळशी) घाटात खचला आहे. त्यामुळे महामार्ग 5 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
Pune Konkan Highway
Pune Konkan HighwaySaam Digital
Published On

पुण्यातील चांदणी चौकातून कोकणात जाणारा राष्ट्रीय महामार्ग 5 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. चांदणी चौकातून कोकणात जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आदरवाडी आणि डोंगरवाडी (ता. मुळशी) घाट परिसरातील रस्त्याला अतिवृष्टीमुळे तडे गेल्यामुळे रस्ता खचला आहे. प्रवाशांची सुरक्षा तसंच दुर्घटना टाळण्यासाठी ५ ऑगस्टपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

Pune Konkan Highway
Narayan Rane On Uddhav Thackeray : वाकड्यात शिरला तर...! PM मोदी, फडणवीसांवर केलेल्या टीकेवरून नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुळशी तालुक्यात गेली दोन आठवड्यांपासून अतिवृष्टी होत आहे. अतिमुसळधार पावसामुळे रस्त्याला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. पिरंगुट घाटामध्ये जागोजागी दरडी ही कोसळल्या आहेत. चांदणी चौकातून कोकणाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर भुगाव, भुकुम, पिरंगुट, शिंदेवाडी या परिसरामध्ये महामार्गावर गुडघाभर पाणी साचते.

गेल्या महिन्यात आदरवाडी येथील पिकनिक पॉईंट हॉटेलवर दरड कोसळल्याने हॉटेलमधील शिवाजी मोतीराम बहिरट यांचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला होता. आदरवाडी व डोंगरवाडी या गावाजवळील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 एफ रस्त्याला एका बाजूने अतिवृष्टीमुळे तडा गेला असल्याने हा रस्ता खचलेला आहे. हे ठिकाण ताम्हिणी घाट वन परिसर क्षेत्रात येतं.

Pune Konkan Highway
Gunratna Sadavarte On Supreme Court : SC, ST आरक्षणाबाबतचा निकाल चुकीचाच ; गुणरत्न सदावर्तेंचं सुप्रीम कोर्टाच्या निकालालाच आव्हान

रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे कामे सुरू असून वाहतूक सुरक्षितेच्यादृष्टीने उपाययोजनाही करण्यात येत आहेत. पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तथापि पुढील काही दिवसात अतिवृष्टीमुळे हा रस्ता खचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या महामार्गावरुन नियमित वाहतूक ठेवणे धोकादायक आहे. तसेच शनिवार व रविवारी ताम्हिणी घाट परिसर क्षेत्रात पर्यटकांची गर्दीही होत असते. त्यामुळे 5 ऑगस्टपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिले आहेत.

Pune Konkan Highway
Narayan Rane On Uddhav Thackeray : वाकड्यात शिरला तर...! PM मोदी, फडणवीसांवर केलेल्या टीकेवरून नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com