Maratha Reservation Protest, Maratha Quota  Saamtv
महाराष्ट्र

Manoj Jarange : जरांगेंचं उपोषण मागे, तरीही काही ठिकाणी आंदोलन सुरूच; मुंबई- आग्रा महामार्ग रोखला

Maratha Reservation Protest in Maharashtra : नाशिक, पंढरपूरमध्ये मराठा बांधवांनी आजही आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको केला.

Gangappa Pujari

Maratha Reservation Protest:

राज्यात सध्या मराठा आरक्षाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेत मुदत वाढवून दिली आहे. जरांगेंनी उपोषण मागे घेतले. मात्र राज्यातील विविध भागातील मराठा बांधव आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. नाशिक, पंढरपुरमध्ये मराठा बांधवांनी आजही आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको केला.

मुंबई- आग्रा महामार्गावर रास्ता रोको...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जरी आंदोलन मागे घेतले असले तरी संतप्त मराठा बांधवांकडून आंदोलन केले जात आहे. नाशिकमधील (Nashik) मराठा बांधवांनी आक्रमक भूमिका घेत मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला. या रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतुकही काही काळ ठप्प झाली.

तुळजापूरमध्ये मराठा बांधवांचा महामोर्चा...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तुळजापूरमध्ये (Tuljapur) महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मनोज जरांगे यांच्या पत्नी सुमित्रा जरांगे पाटील सहभागी झाल्या आहेत. या मोर्चामध्ये सर्व जाती धर्मांच्या लोकांचा सहभाग आहे. तसेच वकील संघटना आणि तृथीय पंथियांनीही मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत मोर्चामध्ये सहभाग घेतला.

सोलापूरमध्ये पदयात्रा..

दक्षिण सोलापूरमध्येही (Solapur) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पदयात्रा काढण्यात आली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरमणी गावपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जवळपास २०- २५ किलोमीटरपर्यंत ही पदयात्रा निघाली.

मनोज जरांगे पाटील यांनी केवळ आमरण उपोषण मागे घेतले आहे. आरक्षणाची लढाई संपलेली नाही. सरकारला दोन महिन्याची मुदत दिली आहे, त्यावेळेत शासनाचे आरक्षण जाहीर करावे, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nilesh Ghaywal : खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला; निलेश घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? VIDEO

Black Pepper : दररोज काळीमिरी खाल्ल्याने आरोग्याला होतात 'हे' भन्नाट फायदे

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला खोटा? अहवालात नेमकं काय?

Face Care Tips: ग्लोइंग त्वचेसाठी बेसन आणि हळदीचा पॅक लावताय? थांबा, होतील 'हे' दुष्परिणाम

Kolhapur News : कोल्हापुरात इमारतीचा स्लॅब कोसळला; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT