nashik Crime News
nashik Crime NewsSaam Digital

Nashik News: नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावयायिकाची आत्महत्या, नेमकं कारण काय?

Nashik news: नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावयायिकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
Published on

तरबेज शेख

Nashik news:

नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावयायिकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांचा भाऊ मनोहर कारडा यांनी रेल्वेखाली उडी मारत केली आत्महत्या केली आहे. या घटनेने बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मनोहर कारडा यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांचा भाऊ मनोहर कारडा यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी मनोहर यांचा भाऊ नरेश कारडा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा करण्यात आला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

nashik Crime News
Dhule Crime: पिकअप वाहन पळवणाऱ्या चोरट्याला धुळे पोलिसांनी अवघ्या २४ तासात ठोकल्या बेड्या

एक कोटी वीस लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी बिल्डर नरेश कारडा यांना अटक करण्यात आली होती. नाशिक शहरातील नामांकित बिल्डर म्हणून कारडा कन्स्ट्रक्शनची ओळख आहे. मनोहर कारडा यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.

nashik Crime News
Kalyan Crime News: ब्रेकअप केल्याने प्रेयसीला घरात घुसून पेटवलं; कल्याणमधील काळजाचा थरकाप उडवणारी घटना

दोन दिवसांपूर्वी नरेश कारडा यांना अटक

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील कारडा कन्स्ट्रक्शनचे बिल्डर नरेश कारडा यांना आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. बुकिंग रक्कम घेऊनही बांधकाम प्रकल्पाला सुरुवात न केल्याने गुंतवणूकदारांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई नाका पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नाशिक शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com