Dengue Cases In Nashik Saam TV
महाराष्ट्र

Nashik Dengue Update: नाशिककरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ३६५ वर; आरोग्य विभाग अलर्ट

Nashik Latest News: नाशिकमध्ये डेंग्यूच्या रोगाने डोकेदुखी वाढवली असून या आठवडाभरात ९६ नवे रुग्ण आढळले आहेत. पालिका प्रशासनाकडून डेंग्यू निर्मूलनासाठी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे

अभिजित सोनावणे

नाशिक, ता. ९ जुलै २०२४

एकीकडे राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातलेला असतानाच आता साथीच्या रोगांनी डोके वर काढले आहे. नाशिक शहरामध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून आठवडाभरात ९६ नवे रुग्ण आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकमध्ये डेंग्यूच्या रोगाने डोकेदुखी वाढवली असून या आठवडाभरात ९६ नवे रुग्ण आढळले आहेत. यासोबतच डेंग्यूच्या एकूण रुग्णसंख्येचा आकडा ३६५ वर पोहचला असून शहरातील सिडको विभागात डेंग्यूचे सर्वाधिक ३८ रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर नाशिकरोड विभागात २१, नाशिक पूर्व विभागात १५, नाशिक पश्चिम आणि पंचवटी विभागात प्रत्येकी १० तर सातपूर विभागात २ रुग्ण आढळलेत.

डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सरकारी रुग्णालयांपेक्षा खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असून रुग्णसंख्या वाढल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाला जाग आली आहे. पालिका प्रशासनाकडून डेंग्यू निर्मूलनासाठी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे तर डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या आस्थापना, व्यक्तींना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातही साथीच्या रोगांनी डोके वर काढले आहे. सध्या अमरावती जिल्हात डेंग्यूचे 72 आणि चिकनगुणीयाचे 32 रुग्ण आहेत. त्यामुळे अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची गर्दी झाली आहे. अमरावती जिल्हा रुग्णालयात विविध आजाराचे रुग्ण दाखल झाले असून एका बेडवर दोन रुग्ण उपचार घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT